विमानाचे नव्हे, 'सत्याचे अपहरण’

    दिनांक :25-Sep-2024
Total Views |
jihadist terrorists : आय. सी. ८१४ : द कंधार हायजॅक’ या मालिकेत नसीरुद्दीन शहाला का घेतले, असेल असा प्रश्न निश्चितच उपस्थित होतो. ? त्याची कामगिरी दयनीय आहे. त्याने मालिकेसाठी कोणतीही तयारी केली नाही आणि केवळ आंधळेपणाने भूमिका केल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘गाझी अटॅक’ चित्रपटातील ओम पुरी यांची नौदल प्रमुखाची भूमिका जशी सुमार होती अगदी तशीच सुमार भूमिका नसीरुद्दीन शहाने वठविली आहे. ओम पुरी ‘गाझी अटॅक’ या भूमिकेसाठी पूर्णपणे अयोग्य होते, असे अनेक तज्ज्ञांचे मत होते. वास्तविक दोघेही उत्तम अभिनेते आहेत. मात्र, या दोघांनाही कसदार अभिनय करता आलेला नाही. ज्याप्रमाणे एखाद्या महान क्रिकेटपटूच्या जोपर्यंत प्रत्यक्ष खेळपट्टीवर पाय ठेवत नाही तोपर्यंत त्याच्या काहीही अर्थ नसतो अगदी त्याप्रमाणेच या दोन चित्रपट कलावंतांचे झाले आहे. नसीरुद्दीन शहा वामपंथी विचारसरणीचा असल्यामुळे त्याचा परिणाम अभिनयावर झाला असावा असे दिसते. स्क्रिप्टेड संवादाऐवजी शहा आपले वैयक्तिक विचार व्यक्त करीत आहे, असे अनेक प्रसंगात दिसून आले आहे. उदाहरणार्थ, एका गंभीर परिस्थितीत, जेव्हा काही मिनिटांत निर्णय घेण्याची आवश्यकता असते, ते म्हणतात, पंतप्रधानांना आघाडीत सहभागी सर्व घटक पक्षांशी सल्लामसलत करावी लागेल आणि त्यानंतरच ते निर्णय घेऊ शकतात. अशाप्रकारे आणिबाणीची परिस्थिती ओढवल्यानंतर त्यावर मात करण्यासाठी कुठलाही तातडीचा निर्णय घेणे शक्य नाही, अशाप्रकारचे चित्रण चित्रपटात करण्यात आले आहे. हा वस्तुस्थितीचा विपर्यास आहे. विमान अपहरण प्रसंगाच्यावेळी केंद्रात अटलबिहारी वाजपेयींचे सरकार होते. त्यावेळी सरकारचे प्रमुख या नात्याने जे निर्णय तातडीने घेणे आवश्यक होते ते सर्व घेण्यात येऊन त्याची अंमलबजावणी देखील झाली होती. याच अटलजींच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने पोखरण अणुचाचणी करण्याचा निर्णय तातडीने घेतला आणि त्याची त्याची तडकाफडकी अंमलबजावणी देखील केली. हा निर्णय घेतेवेळी त्यांनी घटक पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित केले होते काय?
 
 
Viman-1
 
jihadist terrorists जेव्हा विचारण्यात आले की ते असे का करीत आहेत, तेव्हा अपहरणकर्ता मालिकेत अनेकदा युक्तिवाद करतो की आमच्या देशावर झालेला अन्यायाचा बदला घेण्यासाठी आपण विमानाचे अपहरण केले व हा दावा करताना अपहरणकर्ता अफगाणिस्तानचा उल्लेख करतो. वस्तुस्थिती ही आहे की तालिबानची आधीपासूनच अफगाणिस्तानावर राजवट होती. भारतातील तुरुंगात असलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाच्या सुटकेची करण्यात आली होती आणि सगळे अपहरणकर्ते पाकिस्तानातून आले होते. वास्तविक अपहरणकर्त्यांना, त्यांच्या पाकिस्तानात बसलेल्या म्होरक्यांना आपला जिहादी अजेंडा राबवायचा होता. आता त्याबाबत भारतीयांना पूर्णपणे माहीत आहे. मात्र, या विषयाला या मालिकेत गौण स्थान देण्यात आले आहे. मालिकेत भारतीय वरिष्ठ अधिकारी सुरुवातीला अतिशय बेफिकीर आणि जवळजवळ बेजबाबदार असल्याचे दाखवले जाते, राष्ट्रीय सुरक्षेपेक्षा परस्पर शत्रुत्वात जास्त रस असतो. तेच लोक पुढे जीव धोक्यात घालून अतिशय कठीण परिस्थितीत कौतुकास्पद काम करतात. मात्र, हा विरोधाभास विश्वासार्ह वाटत नाही.
 
 
पंजाबच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पंजाब पोलिसांच्या कमांडो टीमला कारवाई करण्यास हिरवी झेंडी न दाखविल्याने अमृतसरमध्ये कमांडो कारवाई होऊ शकली नाही, असे या मालिकेत दाखविण्यात आले तसेच जम्मू-काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री एकाही दहशतवाद्याला सोडायला अजिबात तयार नव्हते आणि केंद्राला त्यांची फसवणूक करावी लागली असेही यातून सांगण्यात आले. हेही आपल्याला माहीत आहे. या दोन्ही गोष्टीत तथ्य आहे की नाही हे आम्हाला माहीत नाही. तसे जर नसेल तर आपला राजकीय अजेंडा राबविण्यासाठीच अशाप्रकारचे चित्रण मालिकेत करण्यात आल्याचे जर म्हणत असेल तर त्याला चूक मानता येणार नाही. या मालिकेत नक्कीच काही सकारात्मक पैलू आहेत. सिनेमाच्या दृष्टिकोनातून ते चांगले आहे. तांत्रिक दृष्ट्या काही दृश्य अप्रतिम आहेत. विजय वर्मा एक परिपूर्ण अभिनेता आहे आणि त्याने त्या दुर्दैवी विमानाचा कॅप्टन म्हणून अतिशय प्रभावी भूमिका केली आहे. ‘फिक्शन’ ब्लफ योग्य ठरविण्यासाठी अनावश्यकपणे नावासह जसवंतसिंह यांची भूमिका अनुभवी पंकज कपूरने वठविली आहे. स्थानांची निवड चांगल्या प्रकारे केली आहे आणि ती अस्सल दिसतात.
 
 
jihadist terrorists मात्र, येथे उपस्थित होणारा खरा प्रश्न केवळ नैतिकतेचा आहे. ज्या घटनांचा राष्ट्रीय मानसिकतेवर खोलवर परिणाम झाला आहे आणि ज्या आजही प्रत्येकाच्या स्मरणात आहेत, त्या घटना जशा आहेत तशा न दाखविता विपर्यास करून दाखविल्या जाऊ शकतात का? हे सर्जनशील स्वातंत्र्य आहे की इतिहासाचे जाणीवपूर्वक केलेले विकृतीकरण? उदाहरणार्थ, अमेरिकन कमांडो पाकिस्तानातील ओसामा बिन लादेनच्या लपण्याच्या ठिकाणी पोहोचल्यावर लादेनने त्यांना पाणी आणि जेवण दिल्याचे जर कोणी दाखवले तर अमेरिकन प्रेक्षक ‘वास्तविक घटनांवर आधारित काल्पनिक कथा’ या नावाने अशाप्रकारचे चित्रण मान्य करतील का?
 
 
तर मसूद आज कब्रस्तानात असता’
वेब सिरीजमध्ये विमान अपहरणकर्त्यांची खरी नावे लपवण्यात आल्याचे जम्मू-काश्मीरचे माजी डीजीपी एस. पी. वैद यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, ‘‘तुम्ही लोकांना संभ्रमित करीत आहात, हे अतिशय खेदजनक आहे. ज्यांना ही संपूर्ण पृष्ठभूमी माहिती असण्याची शक्यता नाही अशा पुढच्या पिढीला वाटेल की या विमानाचे अपहरण लोकांनीच केले व यात आयएसआय आणि पाकिस्तानची कुठलीही भूमिका नव्हती.’’ ते पुढे म्हणाले, ‘मला मसूदला जम्मूला घेऊन जावे लागले, जिथे त्याला दिल्लीत घेऊन जाण्यासाठी एक विशेष विमान थांबले होते. मसूद अझहरच्या चेहर्‍यावरचे घृणास्पद हास्य सांगत होते की त्याने स्वत:ला सोडविण्यासाठी भारताला कसे भाग पाडले आहे.’ ‘‘जर आज मसूद अझहरसारख्या असेच करण्याचा प्रयत्न केला असता तर आज तो कब्रस्तानात असता. कुठल्याही परिस्थितीत विमानाला अमृतसरहून उड्डाण करू दिले नसते’’, असेही माजी डीजीपी एस. पी. वैद यांनी ठामपणे सांगितले.
विमानातील ‘ती’ व्हीआयपी व्यक्ती!
jihadist terrorists अपहरण झालेल्या विमानातील प्रवाशांच्या सुरक्षित सुटकेसाठी स्वित्झर्लंड आणि अमेरिकेसह अनेक देशांनी भारतावर दबाव आणला होता, कारण त्या अपहृत स्वित्झर्लंडमधील एक व्हीआयपी आणि अतिशय श्रीमंत व्यक्ती बसली होती. ही व्यक्ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे जगातील अतिमहत्त्वाची व्यक्ती होती. ती विमानात असल्याची ना भारत सरकारला कल्पना होती ना त्या जिहादी दहशतवाद्यांना! इटलीमध्ये जन्मलेल्या रॉबर्टो गिओरी नावाच्या या व्यक्तीकडे स्वित्झर्लंड आणि इटलीचे दुहेरी नागरिकत्व होते. गिओरी स्वित्झर्लंडमधील एका प्रिंटिंग प्रेसचा मालक होता.
 
 
प्रेसमध्ये कोणतेही वर्तमानपत्र छापले जात नव्हते, तर चलनी नोटा छापल्या जात होत्या. १९९९ मध्ये त्याच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये सुमारे १५० देशांच्या चलनी नोटा छापण्यात आल्या. ज्या वेळी हे अपहरण कांड झाले त्यावेळी रॉबर्टो गिओरी यांची कंपनी डे ला रुई गिओरी ही अमेरिकन डॉलरचे नवीन प्रारूप, रशियन रुबल, जर्मन मार्क इत्यादी युरोपीय चलनी नोटांवर काम करीत होती. अमेरिकन न्यूज साप्ताहिक पत्रिका ‘टाईम’ अनुसार जगातील ९० टक्के करन्सी प्रिंटिंग व्यवसायावर गिओरीच्या कंपनीचे नियंत्रण होते.
 
 
मुसलमान होण्यासाठी दबाव
विमान आय. सी. ८१४ चे अपहरण करणार्‍या jihadist terrorists जिहादी दहशतवाद्यांनी प्रवाशांवर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला होता. विमानात बसलेल्या अनेक प्रवाशांनी सांगितले की, एका दहशतवाद्याने अनेक भाषणे केली, ज्यात तो इस्लामला चांगले आणि हिंदू धर्माला वाईट म्हणत होता. यानंतर तो तिथे बसलेल्या प्रवाशांना इस्लामचा स्वीकार करा, असे सांगत होता. यासोबतच या जिहादी दहशतवाद्यांनी कंगाल अफगाणिस्तानसाठी देणगी देण्यास सांगितले होते.
(पांचजन्यवरून साभार)