मुंबई,
Sanjay Raut convicted-defamtion आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिवडी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी खासदार राऊत यांना १५ दिवसांची कैद आणि २५ हजारांचा दंड भरण्याची शिक्षा सुनावण्यात आली. वर्ष २०२२च्या या प्रकरणात भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर राऊत यांनी आरोप केले होते. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर सुनावणी पूर्ण होऊन, आज हा निकाल आला. मात्र, थोड्याच वेळात १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर खासदार राऊत यांना जामीन मिळाला.
Sanjay Raut convicted-defamtion मीरा भाईंदर परिसरातील शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर केला होता. खासदार संजय राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असला तरी ते जामीनास पात्र आहे. मात्र, आता संजय राऊत यांना रितसर न्यायालयासमोर हजर होऊन न्यायालयापुढे आत्मसमर्पण करावे लागेल. त्यानंतर, त्यांना जामीन मिळाला. दरम्यान, सुनावणीच्या वेळी खासदार राऊत न्यायालयात उपस्थित नव्हते, हे विशेष!
हेही वाचा : चीनने जगाला हादरवले...पृथ्वीच्या फिरण्याचा वेग मंदावला?
Sanjay Raut convicted-defamtion अशाप्रकारची बेताल वक्तव्ये करण्याला या निर्णयामुळे चाप बसेल, अशी प्रतिक्रिया मेधा सोमय्या यांनी व्यक्तकेली. मला वाटतं की, आजही आपली न्यायव्यवस्था रामशास्त्री प्रभुणे यांच्या पावलावर पाऊल टाकून चालते आहे. मी न्यायव्यवस्थेला मनापासून धन्यवाद देते. माझ्या कुटुंबावर , माझ्या मुलावर कोणी वैयक्तिक आरोप करून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला तर एक सामान्य गृहिणी जशी लढेल, तशीच मी लढले. मला न्यायालयाने न्याय दिला आहे. मी समाजसेवा करते आणि शिक्षणही देते, या दोन्ही गोष्टींचा सन्मान न्यायालयाने केला, असं वाटतं. मी न्यायालयाच्या निकालावर समाधानी आहे.
Sanjay Raut convicted-defamtion मेधा सोमय्या यांनी शौचालय घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. या आरोपाचे पुरावे द्यावेत, असं आव्हान किरीट सोमय्या यांनी राऊत यांना दिलं होतं. मात्र, संजय राऊत यांनी कोणतेही पुरावे न दिल्याने मेधा सोमय्या यांनी त्यांच्यावर १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला होता. एका रुपयाचा घोटाळा झालेला नाही, घोटाळ्याचे पुरावे/कागदपत्रं काहीच नसताना, संजय राऊत यांनी फक्तबदनाम करण्यासाठी अपप्रचार केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.