...म्हणून कोसळला छत्रपतींचा पुतळा!

26 Sep 2024 15:59:29
सिंधुदुर्ग,
 
 
Statue-Sindhudurg-Rajgad छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला पुतळा गेल्या महिन्यात २६ तारखेला कोसळला आणि महाराष्ट्रातील राजकारणाने नवाच रंग घेतला. सोसाट्याचा वारा, भुसभुशीत जमीन, जातीचे राजकारण, घातपात अशा सगळ्या शक्यतांवर आरोप-प्रत्यारोप झाले. या घटनेमागील कारणांची मीमांसा करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने चौकशी पूर्ण केली असून, आपला १६ पानी अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. ही बातमी तुम्ही वाचलीत का ...  संतापजनक...छत्रपतींचा पुतळा कोसळला !
 

Statue-Sindhudurg-Rajgad 
 
 
Statue-Sindhudurg-Rajgad भारतीय नौदलातील कामाचा दोन दशकांहून जास्त अनुभव असलेले अधिकारी पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षततेली पाच सदस्य समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटीचे प्रा.जांगिड, प्रा.परिदा यांचा समावेश होता. राज्य सरकार दोषींवर नक्कीच कठोर कारवाई करेल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
 ही बातमी तुम्ही वाचलीत का ...धडाकेबाज...पुन्हा उभारणार शिवरायांचा पुतळा!
 
 
Statue-Sindhudurg-Rajgad अहवालानुसार, महाराजांच्या पुतळ्याला आतून गंज लागला होता. तसंच, पुतळ्याची कमकुवत फ्रेम आणि दोषयुक्त वेल्डींगमुळे पुतळा कोसळल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं. शिवाय, महाराजांच्या पुतळ्याचं मूळ डिझाईन आणि आखणीच अयोग्य असल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.
 हेही वाचा : 'पाकिस्तान...जगाला झालेला कर्क रोग' असे का म्हणाले योगी ?
 
 
Statue-Sindhudurg-Rajgad शिवाय, वेल्डिंगमध्ये अनेक ठिकाणी चुका असल्याचंही समितीच्या अहवालात सांगण्यात आलं आहे. शिवाय, पुतळा उभारल्यानंतर त्याची देखभाल करण्यात उणिवा असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. चौकशी समितीच्या अहवालातील सूचनांनुसार दोषींवर कारवाई होणार असल्याचा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.
Powered By Sangraha 9.0