अबब...माकडाने भर वर्गात घुसून मारली मुलीला मिठी, VIDEO

26 Sep 2024 11:47:32
छतरपूर,  
monkey viral video माणसं आपल्या प्रेमळ भावना व्यक्त करण्यासाठी एकमेकांना मिठी मारतात, पण केवळ माणसंच अशा भावना व्यक्त करतात असं नाही, तर कधी कधी प्राणीही आपल्या भावना उघडपणे व्यक्त करतात. अलीकडच असाच एक व्हिडिओ लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जिथे एक माकड शाळेत घुसून विद्यार्थ्याला मारताना दिसत आहे.
 
monkey viral video
 
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे महाराजा छत्रसाल बुंदेलखंड विद्यापीठात एक वर्ग सुरू होता, त्या दरम्यान एक माकड आत शिरले. वर्गात बसलेले विद्यार्थी माकडाला पाहून चांगलेच घाबरतात. monkey viral video माकड या बेंचवरून उडी मारून दुसऱ्या बाकावर पोहोचते. दरम्यान तो एका विद्यार्थिनीला पाहतो आणि मुलीला प्रेमाने मिठी मारू लागतो. 
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, माकड एका विद्यार्थिनीला मिठी मारताना दिसत आहे, बराच वेळ तिच्याशी खेळत राहिला आणि नंतर दुसऱ्या बेंचवर पोहोचल्यानंतर त्याने कोणाची तरी पेन फोडली आणि कोणाची कॉपी फाडली. मात्र, या संपूर्ण घटनेत माकडाने कुणालाही इजा केली नाही. monkey viral video मुलांनी या माकडाच्या उड्या मारण्याचा व्हिडिओही बनवला. जो सध्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Powered By Sangraha 9.0