मोठी कारवाई...रितिका मालूला अटक

26 Sep 2024 13:19:32
नागपूर,
 
 
ritika maloo-Nagpur-hit and run रामझुला हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी आणि वर्धमान नगरच्या देशपांडे ले-आऊटची रहिवासी रितिका मालू यांना सीआयडीने (CID) अटक केली आहे. सायंकाळनंतर महिलांना अटक करता येत नाही, हा नियम असला तरी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निर्देशांनीुसार रात्री साडे दहा नंतर मालू यांना अटक करण्यात आली.
 ही बातमी तुम्ही वाचलीत का ? संतापजनक.. नागपुरात पुन्हा हिट अँड रन, पाच जणांना चिरडले, video
 

ritika maloo-Nagpur-hit and run 
 
 हेही वाचा : मोठा धक्का...संजय राऊत दोषीच! तुरुंगात रवानगी?
ritika maloo-Nagpur-hit and run तूफान वेगात मर्सिडीज चालवत, मालू यांनी राम झूलावर (Ram Jhula) दोन युवकांना उडविले होते. या घटनेला २१४ दिवस पूर्ण झाले आहेत. बुधवारी दुपारनंतर घडलेल्या वेगवान घडामोडींमध्ये सत्र न्यायालयाने (Nagpur Sessions Court) मालूचा जामीन रद्द करीत, केंद्रीय अन्वेषण खात्याच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे करण्याचे निर्देश दिले. रात्री उशिरा, मध्यरात्रीनंतर सीआयडीचे दोन महिला अधिकाऱ्यांसह एकूण १० अधिकारी मालूच्या पहिल्या घरी दाखल झाले.
 हेही वाचा : तुमच्याकडे आहे का सोनं ? मग लवकरच होणार मालामाल!
 
ritika maloo-Nagpur-hit and run साधारण ४० मिनिटे शोध घेतल्यानंतर, अधिकाऱ्यांची चमू, त्याच रांगेत असलेल्या मालू कुटूंबियांच्या पाचव्या बंगल्यात दाखल झाली. या घरात तपासणी करून, अधिकाऱ्यांनी रितिका मालूला अटक केली. साधारण पावणे दोन वाजताच्या सुमारास आरोपी मालूसह सीआयडीचे अधिकारी रवाना झाल्याची माहिती आहे.
Powered By Sangraha 9.0