आर्वीत सौर विकास !

घर घरात सौर ऊर्जा निर्मिती

    दिनांक :26-Sep-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
जिल्ह्याचे ठिकाण  solar energy project असलेल्या वर्धेपासुन 55 किमी अंतरावर असलेला आर्वी तालुका आजपर्यंत विकासापासुन कोसो दूर होता. आता मात्र आर्वी तालुक्याला सुगीचे दिवस यायला लागले आहे. तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पावर उभारण्यात येणार्‍या 505 मेगावॅट क्षमतेच्या तरंगता सौरऊर्जा प्रकल्प विकासासाठी महानिर्मिती आणि केंद्र सरकारच्या सतलज जल विद्युत निगम लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गुरुवार 26 रोजी मुंबईत सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या केल्या.
 
 

solar project 
 
निम्न (लोअर) solar energy project वर्धा प्रकल्प वरुड-धानोडी येथील वर्धा नदीवर असून यावर प्रस्तावित असलेल्या तरंगता सौरऊर्जा प्रकल्पाकरिता जवळपास 732 हेक्टर जलक्षेत्राची निवड केली जाणार असुन जवळपास 3030 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. वार्षिक हरित ऊर्जा निर्मिती जवळपास 1051.28 दशलक्ष युनिट्स अपेक्षित असून 36 महिन्यांमध्ये प्रकल्प उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारने मान्य केलेल्या तरंगता सौरऊर्जा प्रकल्पामुळे राज्यात सौरऊर्जा निर्मितीला चालना मिळेल आणि नूतनीकरण योग्य बंध पूर्ण करण्यास तर सौरऊर्जा प्रकल्प स्थापित क्षमतेचे आणि निर्मितीचे समतुल्य उत्सर्जन टाळून कार्बन उत्सर्जन कमी करण्यास सहाय्यभूत ठरेल. या माध्यमातून पारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी महाग जीवाश्म इंधन खरेदी टाळता येईल. कोळशाचाही वापर जवळपास 8,49,434 टनाने कमी करण्याकरिता मदत मिळणार आहे.
उद्योग व रोजगारनिर्मितीकडे पहिली झेप
आर्वी तालुक्याच्या solar energy project विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार्‍या या प्रकल्पामुळे जवळपास 1400 व्यक्तींना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. 505 मेगा वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पास राज्य सरकारची मान्यता. 3030 कोटींची गुंतवणूक करून प्रकल्प उभारणार. स्थानिक क्षेत्राचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष विकास होणार आहे. आर्वी विधानसभा मतदार संघाचा विकास हे ध्येय आपण आपल्यापुढे ठेवले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रत्यक्ष काम केल्याने त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले. आजपर्यंत उपेक्षित असलेल्या तालुक्यात हा प्रकल्प येणे हे तालुक्यातील विकासाचे पहिले पाऊल असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते सुमित वानखेडे यांनी दिली.