वेकोलीत स्वच्छता ही सेवा अभियान

27 Sep 2024 20:49:13
- विविध उपक्रमांचे आयोजन
 
नागपूर,
'Swachhta Hi Seva' : केंद्र सरकारच्या कोळसा मंत्रालया अंतर्गत सिव्हील लाईन्स स्थित सार्वजनिक उपक्रम असलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड द्वारे स्वच्छता ही सेवा अभियाना अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन २ ऑक्टोबर पर्यंत करण्यात आले आहे. वेकोलीच्या २७०० पेक्षा जास्त कर्मचार्‍यांनी स्वच्छता शपथ घेऊन आपल्या कार्यालयामध्ये साफसफाई केली. याच अभियानाअंतर्गत ‘एक पेड माँ के ही भव्य वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.
 
 
Swachhta
 
'Swachhta Hi Seva' : सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेचेही लक्ष्य ठेवण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत बसस्थानक, छोटे महादेव, उर्जाग्राम बाजार आदी ठिकाणांची स्वच्छता वेकोलीतर्फे करण्यात आली. स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत ६५० स्वच्छता सेफ्टी किट, टी-शर्ट वाटप होणार असून आतापर्यंत १२० सेफ्टी किट, टी-शर्ट इत्यादी पुरविण्यात आले आहेत. विविध शाळा व संस्थांमध्ये स्वच्छते संदर्भात जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने या विषयावर निबंध, प्रश्नमंजुषा, घोषवाक्य, चित्रकला, पोस्टर मेकिंग अशा स्पर्धा घेण्यात येत आहेत.
Powered By Sangraha 9.0