महिलेने केली मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड

    दिनांक :27-Sep-2024
Total Views |
मुंबई, 
Fadnavis's office vandalized : उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका महिलेने तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सचिवांसाठी असलेल्या संबंधित महिलेने पास न काढता मंत्रालयात प्रवेश केला. यानंतर तिने थेट फडणवीस यांचे कार्यालय गाठून तेथे तोडफोड केली आणि निघून गेली. यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
 
 
Fadnavis's office
 
Fadnavis's office vandalized : गुरुवारी सायंकाळाच्या सुमारास धनश्री सहस्रबुद्धे नामक महिला मंत्रालयाच्या परिसरात फारसा पोलिस बंदोबस्त नसल्याचा फायदा घेत सचिवांच्या गेटने सहजपणे आत शिरली. यानंतर सहाव्या मजल्यावर असलेल्या फडणवीसांच्या कार्यालयाबाहेरील नेमप्लेट काढून फेकली व घोषणाबाजी केली. त्यानंतर ती तिथून निघून गेली. याप्रकरणी फडणवीसांच्या कार्यालयाकडून तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिस कामाला लागले. या घटनेचे सीसीटीव्ही समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. मरिन ड्राईव्ह पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत. मात्र, संबंधित महिला मंत्रालयात तेथील सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. पास नसतानाही महिलेने मंत्रालयात प्रवेश कसा केला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
 
मानसिक स्थिती ठीक नसल्याची माहिती
महिलेचे नाव धनश्री सहस्त्रबुद्धे असून, तिची मानसिक स्थिती ठीक नसल्याने सध्या तिचे पोलिसांकडून समुपदेशन करण्यात येत आहे. ही महिला मुंबईच्या दादर विभागात वास्तव्यास असल्याची समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, संबंधित महिलेचे मानसिक संतुलन बिघडले आहे आणि तिच्या विरोधात इमारतीत देखील अनेक तक्रारी आहेत. ही महिला मनोरुग्ण असून, याआधी तिने तिच्या वडिलांना मारहाण करण्यासोबतच प्राणघातक हल्ला केल्याची माहिती आहे, ज्यामुळे तिच्या वडिलांनी तिच्यावर गुन्हा देखील दाखल केला आहे.