देर अल-बालाह,
Israeli airstrike on school : इस्रायलने गुरुवारी उत्तर गाझामधील हजारो विस्थापित पॅलेस्टिनींना आश्रय देणार्या शाळेवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात किमान ११ लोक ठार झाले व महिला-मुलांसह २२ जण जखमी झालेत, असे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले. इस्रायली सैन्याने जबलिया निर्वासितांचे शिबिर असलेल्या हल्ला केल्याची पुष्टी केली. आम्ही इस्रायली सैन्यावर हल्ल्याची योजना आखत असलेल्या हमासच्या अतिरेक्यांना लक्ष्य करीत होतो, असा दावा इस्रायलने केला. मात्र, या दाव्याची स्वतंत्रपणे पुष्टी होऊ शकली नाही.
अल-फलौजा शाळेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोठ्या प्रमाणात ढिगारा व लोकांच्या गर्दीत बचाव कर्मचारी शाळेच्या आवारातून जखमींना बाहेर काढताना दिसले. एका व्हिडीओमध्ये पुरुष प्लॅस्टिकच्या पिशवीत छिन्नविच्छिन्न धड गुंडाळताना व शरीराचे अवयव कूलरमध्ये टाकताना दिसला. हमासचे सैनिक हल्ले करण्यासाठी शाळांचा वापर कमांड सेंटर म्हणून करतात, त्यामुळे इस्रायली सैन्याने वारंवार शाळांवर हल्ला केला. आम्ही नागरी जीवितहानी टाळण्यासाठी अचूक शस्त्रे वापरतो, असे इस्रायलचे म्हणणे आहे. इस्रायली बॉम्बफेक व हल्ल्यांना तोंड देत घरे सोडून पलायन केल्यानंतर पॅलेस्टिनी गाझा ओलांडून शाळांमध्ये आश्रय घेऊन राहतात.
Israeli airstrike on school : संयुक्त राष्ट्राच्या मते, गाझातील २.४ दशलक्ष लोकांपैकी १.९ दशलक्ष लोक जवळपास वर्षभर चाललेल्या संघर्षात विस्थापित झाले आहेत. खान युनिस या दक्षिणेकडील शहरात अधिकार्यांनी ८८ पॅलेस्टिनींचे मृतदेह सामूहिक कबरीत दफन केले. शहरातील एका स्मशानभूमीत बुलडोझरने खंदक खोदला आणि बुलडोझरने धूळ झाकण्यापूर्वी मृतदेह निळ्या पिशव्यामध्ये ठेवले. इस्त्रायलने मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसताना ट्रकमध्ये मृतदेहांचे ढीग करून परत पाठवले. मृतदेहांशी केलेल्या अमानवीय व अनैतिक पद्धतीचा निषेध केला, असे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.