वाशीम,
वाशीम (वत्सगुल्म) नगरीचे ग्रामदैवत, नवसाला Navratri 2024 पावणारी देवी म्हणुन चामुंडा देवी जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात भक्तांचे श्रध्दास्थान आहे. नवरात्रोत्सवात याठिकाणी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. नऊ दिवस या मंदिराकडे जाणारे रस्ते सकाळपासूनच भाविकांच्या गर्दीने फुलून जातात. नवरात्राचे नऊ दिवस चामुंडा देवी संस्थानला यात्रेचे स्वरुप येते. वाशीमचे ग्रामदैवत चामुंडा देवी संस्थान आहे. भक्ताच्या हाकेला धावून जाणारी देवी म्हणुन भक्तांची श्रध्दा आहे. साधारण १० फूट गाभार्यात देवीची मूर्तीची स्थापना करण्यात आली. या मंदिराबाबत आख्यायिका प्रसिद्ध आहे. प्राचीन काळी देवी देवतांना ‘चंड आणि मुंड’ या राक्षसांनी त्रस्त केले होते.
देवी देवतांना ‘चंड आणि मुंड’ Navratri 2024 या राक्षाच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी चामुंडा देवी प्रकट झाली आणि या राक्षसाचा वध करुन देवी देवतांना भयमुक्त केले. यामुळे चामुंडा देवीच्या दर्शनाने वाईट प्रवृत्तीचा नाश झाला. नवरात्रोत्सवात इच्छित साध्य होण्यासाठी नतमस्तक होवून घेतलेला नवस पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षी येवून नवरात्रोत्सवातच खणा नारळाने देवीची ओटी भरुन नवस फेडण्याची जुनी परंपरा आहे. यामुळे पसिरातीलच नव्हे तर विदर्भातून इच्छित साध्यासाठी भाविक येथे येतात. नवरात्रौ उत्सवासह दररोज दर्शनासाठी भाविकांची गर्दी याठिकाणी राहत असली तरी नवरात्रौ उत्सवात या मंदिराला यात्रेचे स्वरुप येते.
हेही वाचा : अंबादेवीचा नवरात्रोत्सव ३ ऑक्टोबरपासून
कोल्हापूर येथील तुळजाभवानी Navratri 2024 मंदिराप्रमाणेच नवरात्रौच्या नऊ दिवस खोल गाभार्यातील मूर्तीच्या पहिल्या दिवशी चामुंडा देवीच्या चरणी तर नवव्या दिवशी मस्तकावर सुर्योदयाच्या वेळी थेट सूर्यकिरण पडत असत. आता नव नवीन इमारती व मंदिराचे नव्याने केल्या गेलेले बांधकाम यामुळे सूर्यकिरण गाभार्यापर्यंत येत नसली तरी जुनी जाणती मंडळी अजुनही याबाबत श्रध्देने सांगतांना दिसतात. नवरात्रोत्सवात नवमीच्या दिवशी बालासाहेबाकडून बहीण चामुंडा देवीला चोळी - परकर देण्यात आल्यानंतर होम पेटविण्यात येतो. यानंतर सीमोलंघनाच्या दिवशी बालासाहेब व चामुंडा देवीची पालखी काढण्यात येते. चामुंडा देवी संस्थानची देखरेख पूर्वीपासूनच वानखेडे परिवार करतात. नवरात्रानंतर याठिकाणी भव्य महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या महाप्रसादाचा लाभ पंच्रकोशीतील हजारो भाविक घेतात. अनेक भाविक याठिकाणी अन्नदान करतात.