- नवीन अभ्यासातील धक्कादायक माहिती
लीडेन,
'Microplastic' : प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण आपले अन्न उत्पादन करणार्या मातीत, पितो त्या पाण्यात आणि अगदी श्वास घेतो त्या हवेतही असतात. आपण फेकून दिलेले प्लॅस्टिक जमिनीवर, आणि समुद्रात पोहोचते. या प्लॅस्टिक कचर्याचे अतिशय हळुवार विखंडन होते. या प्रक्रियेत सूक्ष्म प्लॅस्टिक बाहेर पडते आणि त्यातील नॅनोप्लॅस्टिक पर्यावरणात मिसळतात. आपला श्वास मेंदूपर्यंत मायक्रोप्लॅस्टिक पोहोचवू शकते, अशी धक्कादायक माहिती नवीन अभ्यासातून समोर आली आहे.
संपूर्ण मानवी शरीरात सूक्ष्म प्लॅस्टिकचे प्रमाण वाढत आहे. ते नेमके शरीरात कसे दाखल होते, निश्चित माहिती नाही. मात्र, ते तीन मार्गांनी शरीरात पोहोचत असावे. आपण खातो किंवा पाणी पितो त्या माध्यमातून किंवा श्वासाच्या माध्यमातून फुफ्फुसापर्यंत आणि त्वचेतूनही सूक्ष्म प्लॅस्टिक पोहोचत असावे. शरीरात 'Microplastic' प्लॅस्टिक पोहोचण्याच्या एका नवीन मार्गाची माहिती समोर आली आहे. नाकाच्या माध्यमातून ते मेंदूपर्यंत पोहोचत असावे, असे या अभ्यासात सुचवण्यात आले.
मानवी शरीराच्या इतर भागांपासून वेगळा असल्याचे दीर्घकाळापासून समजले जायचे. रक्ताला अवरोध करणार्या पेशींचा विशेष स्तर रोगजनक आणि घातक पदार्थांपासून संरक्षण करतो. मात्र, मानवी मेंदूमध्ये सूक्ष्म प्लॅस्टिक आढळल्याने हा अवरोधक स्तर भेदला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली. रक्ताला अवरोध करणार्या या विशेष स्तरात एक जागा अशी असावी, जिथून सूक्ष्म प्लॅस्टिक पोहोचते, असे नवीन संशोधनातून सुचवण्यात आले. हा प्रवेशबिंदू बर्लिनमधील फ्रीई विद्यापीठ आणि साओ पावलो विद्यापीठाने सुचवला आहे. हा बिंदू नाकात आहे, जिथे घाणेंद्रिय असतात, असे या अभ्यासात म्हटले आहे.
घाणेंद्रियाचे मज्जातंतू नाकाच्या आतून, कवटीच्या माध्यमातून आणि नंतर मेंदूच्या एका भागात जातात, त्याला ‘ऑफ्लेक्टरी बल्ब’ म्हटले जाते. श्वासाच्या माध्यमातून नाकात मायक्रोप्लॅस्टिक घाणेंद्रियाच्या मज्जातंतूतून मेंदूपर्यंत पोहोचते, असे हा अभ्यास सांगतो.
असा काढला निष्कर्ष
'Microplastic' : साओ पावलो येथील एका व्यक्तीचे मृत्यूनंतर नियमित शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या उतींच्या नमुन्याचे विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर संशोधक या निष्कर्षापर्यंत पोहोचले. त्यांनी या व्यक्तीच्या मेंदूतून ‘ओफ्लेक्टरी बल्ब’ हटवला आणि विविध तंत्रांचा वापर करून त्याचे विश्लेषण केले. यात मेंदूंचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी आठ मेंदूंमध्ये सूक्ष्म प्लॅस्टिक आढळले.