मोठी बातमी, सर्व मुस्लिम देश एकत्र येऊन इस्रायलशी लढणार?

28 Sep 2024 18:53:00
दुबई/बेरूत,
Israel Hezbollah War : लेबनॉननेही हिजबुल्लाह प्रमुख सय्यद हसन नसराल्लाह यांच्या हत्येला आज दुजोरा दिला आहे. हिजबुल्लाहने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांचा नेता नसराल्लाह मारला गेला आहे. "गाझा, पॅलेस्टाईन आणि लेबनॉन आणि त्यांच्या सन्माननीय लोकांच्या समर्थनार्थ" इस्रायलविरुद्धचा लढा सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. हसन नसराल्लाह यांच्या मृत्यूनंतर इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांनी मुस्लिमांना एकत्र येऊन इस्रायलविरुद्ध युद्ध लढण्याचे आवाहन केले आहे.

WAR
 
 
एक दिवसापूर्वी बेरूतच्या दक्षिणी उपनगरात हवाई हल्ल्यात नसराल्लाह ठार झाल्याचा दावा इस्रायलने आज केला आहे. नसराल्लाहच्या मृत्यूच्या घोषणेनंतर, हिजबुल्लाहच्या अल-मनार टीव्हीने कुराणातील श्लोक प्रसारित करण्यास सुरुवात केली. नसराल्लाहने इस्रायलसोबतच्या दशकभराच्या संघर्षात हिजबुल्लाचे नेतृत्व केले आहे. त्याने या प्रदेशात एक प्रभावी लष्करी शक्ती देखील तयार केली आणि तेथील लोकांची काळजी घेतली. इस्रायली सैन्याचे प्रवक्ते अविचाई अद्राई यांनी ट्विटरवर दिलेल्या निवेदनात लिहिले आहे की, “इस्रायली सैन्याने हिजबुल्लाह दहशतवादी संघटनेचा नेता हसन नसराल्लाहचा खात्मा केला आहे."
 
खामेनेई म्हणाले - मुस्लिम देशांनी इस्रायलशी एकत्र येऊन लढले पाहिजे
 
हसन नसराल्लाह यांच्या हत्येनंतर इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांनी सर्व मुस्लिमांना एकत्र येऊन युद्ध लढण्यास सांगितले आहे. याआधी खामेनेई यांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. हसन नसराल्लाह यांच्या मृत्यूने इतर मुस्लिम देशांमध्येही खळबळ उडाली आहे. खामेनेई यांनी मुस्लिमांना एकत्र येऊन इस्रायलविरुद्ध युद्ध पुकारण्याचे आवाहन केल्यानंतर मध्यपूर्वेत मोठे युद्ध होण्याची भीती वाढली आहे.
Powered By Sangraha 9.0