बुटीबोरी,
Morarjee Textile Butibori कामगारांच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या एमआयडीसी बुटीबोरी येथील मोररजी कंपनीत अज्ञात चोरांनी धुमाकूळ घालत सुमारे दोन लाखांचा माल चोरून नेला. हा प्रकार २६ सप्टेंबर रोजी उघडकीस आला. काही महिन्यापासून विविध मागण्यांसाठी मोरारजी टेक्सटाईल कंपनीत आंदोलन सुरू आहे. मधल्या काळात ते आंदोलन चिघळले होते.

आता ते आंदोलन थंडबस्त्यात असले तरी अचानक कंपनीत चोरी झाल्याने पुन्हा नवा वाद चर्चेत आला आहे. एमआयडीसी बुटीबोरी अंतर्गत येणाèया मोररजी टेक्सटाईल कंपनीत गोदामात ठेवलेले दोन लाखांचे साहित्य अज्ञात चोरांनी चोरून नेले. एवढी मोठी सुरक्षा यंत्रणाअसतानाही मोरारजी कंपनीत चोरी झाल्याने येथे कुंपणच शेत तर खात नाही ना, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. २६ सप्टेंबर रोजी मोरारजी कंपनीतील सुरक्षा प्रमुख शुभम हेमराज लाकडे आपल्या कर्तव्यावर हजर होते. त्यांनी गोदामाकडे जाऊन पाहिले असता खिडकीच्या काचा फुटलेल्या दिसल्या. Morarjee Textile Butibori त्यांनी याची माहिती तातडीने मोरारजी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर त्यांनी अधिकाèयांसह मालाची पाहणी केली असता सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या मोटारी चोरांनी लंपास केल्याचे समोर आले. एमआयडीसी बुटीबोरी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार पांडे करीत आहेत.