मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि !...काय आहे अर्थ..

कोण आहेत राजा मरुत ज्यांचा आहे उल्लेख ?

    दिनांक :28-Sep-2024
Total Views |
मंत्रपुष्पांजली समर्पयामि !...हिंदू मान्यतेनुसार, Navratri 2024 मंत्रपुष्पांजली म्हटल्याशिवाय आरतीची सांगता होत नाही. याचा पुराणात उल्लेख सापडतो. मंत्रपुष्पांजली किंवा तिलांजली ही आपण प्रत्येक आरतीनंतर म्हणतो. मंत्रपुष्पांजली असे नाव पडले ? चला जाणून घेऊ या.  हेही वाचा : अशी म्हणा मंत्रपुष्पांजली...सर्व देवी-देवता होतील प्रसन्न
 
हा आहे अर्थ
मंत्रपुष्पांजली दिल्याशिवाय आरती Navratri 2024 अपूर्ण मानली जाते. ऋगवेदात उल्लेख आहे, मंत्रपुष्पांजली हे मुळतः तीन शब्दांनी बनले आहे - मंत्र, पुष्प आणि अंजली.
१ . मंत्र- अर्थपूर्ण श्लोकांनी तयार केली प्रार्थना
२ . पुष्प - ज्या देवतेची आपण प्रार्थना, पूजा, उपासना करतो त्या देवतांना अर्पण करण्यासाठी समर्पित करण्यासाठी पुष्प
३ . अंजली- अर्थात, दोन्ही हातांनी जोडून केलेली ओंजळ ज्याद्वारे आपण पुष्प अर्पण करतो.

maruts 
 
 
महाभारतकालीन उल्लेख
मंत्रपुष्पांज़लीचा उल्लेख Navratri 2024 शुक्ल यजुर्वेदात सापडतो. यजुर्वेद हे वेदातील असे उपवेद आहेत जे पूजा, प्रार्थना, अनुष्ठानाशी संबंधित आहे. हिंदू मान्यतेनुसार, मंत्रपुष्पांजलीत उल्लेख केलेले अविक्षित हे इश्वाकू वंशीय राजा होते ज्याचा उल्लेख वायू पुराणात आढळतो. मान्यतेनुसार, वायू पुराण, महाभारत कालखंडातील आहे.
 
याचा उल्लेख असेलेले तीन संदर्भ सापडतात :
१ . महाभारत काळ - राजा मरुत
राजा मरुत, Navratri 2024 अविक्षित राजाचे पुत्र होते. असे म्हंटले जाते की त्यांनी या भूतलावर सुशासन केले. त्यांच्या राज्यात, प्रजा आणि राजा दोन्ही सुखी होते. त्यामुळे मंत्रपुष्पांजली असा उल्लेख आहे की जसे मरुत राजाने आपले साम्राज्य वाढवले, सांभाळले, समृद्ध केले, तसेच आमचे आयुष्य समृद्ध होवोत. मान्यतेनुसार, मरुत राजा हे त्या युगातील यशस्वी राजांपैकी एक होते.
 
२ . रुद्रपुत्र , इंद्र सहाय्यक मरुत
या मान्यतेनुसार, Navratri 2024  मरुत हे भगवान रुद्रचे पुत्र आहेत, याचा उल्लेख देखील वायुपुराणात आढळतो. हे मरुत समूहाने राक्षसांवर प्रहार करतात. यांना 'मरुतगण' असे म्हणतात. ऋग वेदात उल्लेख आहे, भगवान रुद्र आणि देवी रोडसी यांचे हे पुत्र आहे. यांची संख्या एकूण १७ ते ६० अशी असते. हे मरुतगण, देवराज इंद्राला व्रित्रा नावाचा राक्षसाला मारण्यासाठी सहाय्य्यभुत झाले होते. यांच्या म्होरक्याला मरुतवंत म्हणतात.
 
३ .देवी दिती पुत्र - मरुत
अजून एका मान्यतेनुसार, इंद्राने देवी दितीच्या Navratri 2024 गर्भावर वज्र अस्त्रचा प्रहार केला होता, आणि आहत गर्भातून हे मरुत जन्माला आले. सुवर्ण चिलखत घालून अश्वारूढ असलेले हे मरुतगण इंद्राला साहाय्यभूत असतात.