भक्ताच्या हाकेला धावून जाणारी देव्हाळ्याची रेणुका माता

    दिनांक :29-Sep-2024
Total Views |
चंद्रकांत लोहाणा
वाशीम, 
Devala Renuka Mata ३ ऑटोबरपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होवून १२ ऑटोबरला या उत्सवाची सांगता होणार आहे. या दरम्यान जिल्ह्यात स्थापिक दुर्गा मंदिरामध्ये भाविकांच्या गर्दीने रस्ते पहाटेपासून फुलून जातात. संपूर्ण नवरात्र उत्सव अनवाणी पायाने चालणे, नऊ दिवसात नऊ देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे आदी धार्मिक परंपरा जोपासणार्‍या भाविकांचा वर्ग जल्ह्यात खूप मोठा आहे. येथील देव्हाळ्याची रेणुका माता याठिकाणी नऊ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते. तसेच याठिकाणी दुरवरून भाविक दर्शनसाठी येतात. भक्ताच्या हाकेला धावून जाणारी देवी म्हणून भक्तांची श्रध्दा आहे. साडेतीन शक्तीपीठा पैकी माहूरचे रेणुका माता व अनुसया या संस्थानला मोठे महत्व आहे. प्रति माहुरची रेणुका माता म्हणून देव्हाळा संस्थानची अख्यायिका आहे. हेही वाचा : मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि !...काय आहे अर्थ..
 

ehaa 
 
वाशीम नगरीच्या पूर्वेस ३ कि.मी. अंतरावर देव्हाळा परिसरात वाशीमकरांचे आराध्य दैवत जागृत देवस्थान असलेली रेणुका आईचे असे भव्य पुरातनकालीन पूर्वाभिमूख मंदिर आहे. यामध्ये पाषाणातील आकर्षक अशी रेणुका मातेची मूर्ति विराजमान आहे. फार वर्षापूर्वी शिरपूर येथील भक्त रेणुकादास पाटील दरवर्षी नवरात्रोत्सवामध्ये माहुरची पायदळ वारी करत असत. मात्र, कालांतराने शरीर थकल्याने त्यांनी रेणुका मातेला पुढच्या वारीला मी येईल की, नाही अशी आर्त हाक दिली. आपल्या या भक्ताची निस्सीम भक्ती पाहून रेणुका माता प्रकट होवून भक्तांला सांगितले की, तू पुढे हो मी तुझ्या घरी येते. पुढे चालतांना मागे वळून पाहू नकोस. तेव्हा तो भक्त माहुरवरुन शिरपूर या गावी निघाला. हेही वाचा : येथे रावण फिरविणार मान आणि तलवारही चालविणार...
 
मात्र, तो नेमका वाशीम नगरीच्या सीमेवर येताच देव्हाळा परिसरात नाल्याला पूर असल्याने तो भक्त तिथे थांबल्याने पाठीमागे येणार्‍या देवीच्या पैजणाचा आवाज थांबला. त्यामुळे भक्ताने मागे वळून पहिले. Devala Renuka Mata तेव्हा रेणुका माता तेथेच आसनस्थ झाली असल्याची आख्यायिका सांगितली जाते. माहुरच्या रेणुका माता इतकेच वाशीमच्या देव्हाळा एक व दोन या देवी संस्थानला महत्व आहे. ज्या ठिकाणी रेणुका माता आसनस्थ झाली ते ठिकाण हे नदीच्या पलिकडच्या बाजूला आहे. त्यामुळे भक्तांना त्याठिकाणी दर्शनासाठी ये जा करणे अवघड होते. त्यामुळे शहरातील काही भक्तांनी पुढाकार घेवून नदीच्या अलीकडच्या काठावर रेणुका मातेचे दुसरे मंदिर उभारले असले तरी भक्त प्रथम नदीपलीकडच्या मंदिरात जावून दर्शन घेतात व मग अलीकडच्या काठावरील देवीचे दर्शन घेतात. त्यामुळे देव्हाळा संस्थानला एक व दोन अशी नावे पडली आहे.