"श्याम रंगीन हुईं है " ने रिझवली रसिकांची मने

    दिनांक :29-Sep-2024
Total Views |
नागपूर,
Hindi Mor Bhavan Nagpur मनीष नगरच्या अविष्कार ग्रुप ऑफ सिंगर्सच्या वतीने "श्याम रंगीन हुई है" हा हिंदी, मराठी चित्रपट गीतांचा बहारदार कार्यक्रम झाशी राणी चौकातील विदर्भ हिंदी मोर भवनच्या सभागृहात सादर करण्यात आला.अविष्कार म्युझिकल ग्रुपचे संचालक सचिन गर्गे यांचे आयोजन आणि लक्ष्मी गर्गे यांच्या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम श्रोत्यांची श्याम रंगीन करून गेला. विशेष म्हणजे गायक हेमंत गडकरी यांच्या नेटक्या आणि अनुरूप निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढली. महम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने यावेळी त्यांची काही गाणी सादर केली. यावेळी ज्येष्ठ गायिका शीतल पेंचे आणि छाया हिरुळकर यांचा विशेष सत्कार लक्ष्मी गर्गे यांच्या हस्ते करण्यात आला.
 

560 
 
 
मोमिता डे, निहारिका चव्हाण, मृदुल पुरोहित, शीतल पेचे, कुंजल महल्ले, शुभांगी मुडे, डॉ. प्रवीण मेश्राम, छाया हिरुळकर, मोहिनी डोंगळे, Hindi Mor Bhavan Nagpur शंकर मंदवार, पूर्वा, सुवर्णा, संध्या, अजय उपेंद्र सचिन गर्गे, लक्ष्मी गाडगे, हेमंत गडकरी यांनी सादर केलेल्या गाण्यांनी रसिकांच्या मनाचा वेध घेतला.
सौजन्य: अपर्णा कुळकर्णी,संपर्क मित्र