हिजबुल्लाहचा नवा 'प्रमुख' जाहीर...हाशिम सफीद्दीन नवा नेता

29 Sep 2024 12:04:22
हिजबुल्लाह, 
Hizbullah chief Hashim Saifuddin हसन नसरल्लाह यांच्या मृत्यूनंतर हिजबुल्लाहने नव्या नेत्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नसराल्लाहचा चुलत भाऊ हाशिम सफीउद्दीन आता हिजबुल्लाची कमान सांभाळणार आहे. हाशिम सफीउद्दीन हे हिजबुल्लाचे राजकीय कामकाज पाहत आहेत, यासोबतच ते कार्यकारी परिषद आणि जिहाद परिषदेचे प्रमुखही आहेत. हेही वाचा :  अंगठीतून पटली नसराल्लाहची ओळख, इस्रायलने हिजबुल्ला प्रमुखाचा अशा केला खात्मा

Hizbullah chief Hashim Saifuddin 
 
 हेही वाचा :  मोठी बातमी, सर्व मुस्लिम देश एकत्र येऊन इस्रायलशी लढणार?
मिळालेल्या माहितीनुसार, हाशिम सफीउद्दीनचा जन्म 1964 मध्ये दक्षिण लेबनॉनमधील देर कानून एन नहार येथे झाला. तो लेबनीज शिया धर्मगुरू आणि हिजबुल्लाचा वरिष्ठ नेता देखील आहे. हाशिम नेहमी काळी पगडी घालतो आणि त्याला अमेरिकेने दहशतवादी घोषित केले आहे. Hizbullah chief Hashim Saifuddin हाशिम सफीद्दीन स्वतःला पैगंबर मोहम्मद यांचे वंशज असल्याचा दावा करतो आणि तो शिया धर्मगुरूही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सफीद्दीनचा हिजबुल्लाच्या लष्करी आणि धोरणात्मक कारवायांमध्ये मोठा प्रभाव होता आणि त्याची गणना हिजबुल्लामध्ये नसराल्लाह आणि नईम कासिम यांच्यानंतर केली जाते. सुरुवातीपासूनच तो हिजबुल्लाचा संभाव्य उत्तराधिकारी मानला जात आहे. हेही वाचा : नसरल्लाहच्या मृत्यूनंतर 'ही' व्यक्ती सांभाळणार हिजबुल्लाची जबाबदारी
 
नसराल्लाहच्या मृत्यूनंतर हाशिम सफीद्दीन आता इस्रायलच्या निशाण्यावर आहे. सध्या तो इस्रायलचे हल्ले टाळण्यासाठी पळून जात असून रोज आपले ठिकाण बदलत असल्याचे सांगण्यात येत आहे. Hizbullah chief Hashim Saifuddin तुम्हाला सांगतो, शुक्रवारी इस्रायलने लेबनॉनच्या बेरूतमधील काही इमारतींना लक्ष्य केले होते, ज्यामध्ये नसराल्ला राहत होते त्या इमारतीचाही समावेश होता. हल्ल्याच्या काही तासांनंतर इस्रायली लष्कराने नसराल्लाह यांच्या मृत्यूची पुष्टी केली.
हेही वाचा : ८० टनचे बॉम्ब, बँकर केले उधवस्त...असे मारले 'सिरियाचे कसाई' ! 
Powered By Sangraha 9.0