आर्वी,
Wardha-Arvi-Bhavani आर्वी जवळ असलेल्या अहिरवाडा येथील राजा भीमकाच्या काळातील हे आई जगदंबा भवानीच मंदिर प्राचीन काळातील असल्याचं येथील येणारे भाविक भक्त सांगतात. सभोवताल पाणीच पाणी, अनेक आख्यायिका, इतर राज्यातूनही भाविक येतात. दर्शनासाठी, ऐतिहासिक असलेले हे आई जगदंबा भवानीचे मंदिर. वर्धेतील अहिरवाडा येथील अति प्राचिन आई जगदंबा भवानी मंदिर राजा भिमकाच्या काळातील आहे, अशी आख्यायिका आहे. Wardha-Arvi-Bhavani प्रभू रामचंद्र व भगवान श्रीकृष्ण या दोन्ही अवताराशी संबंधित कौंडण्यपूर या तीर्थक्षेत्राच्या पंचक्रोशीत भगवती जगदंबेचे स्थान म्हणून ओळखले जाते. कौंडण्यपूर येथे अंबादेवीचे सुप्रसिद्ध प्राचीन मंदिर असून तेथून श्रीकृष्णाने रुख्मिणीला पळून नेण्याचा इतिहास आहे. Wardha-Arvi-Bhavani हे मंदिर तात्कालीन राजाच्या राजप्रसादाचा भाग असावा व त्यामुळे, सर्वसामान्य प्रजेसाठी अहिरवाडा येथील सध्याच्या भगवती जगदंबेचे मंदिर बांधण्यात आले असावे, असाही विश्वास आहे.
Wardha-Arvi-Bhavaniअहिरवाडा येथील जगदंबा भवानी ही बऱ्याच कुटुंबाची कुलदैवत असल्यामुळे महाराष्ट्रातील भाविकांबरोबरच मध्य प्रदेश, छत्तीसगड व देशातील इतर भागातून सुद्धा मोठ्या संख्येने भाविक मोठ्या संख्येने दर्शनाकरता अहिरवाड्यात येत असतात. श्रीकृष्णाला रुक्मिणी विवाह नंतर हे गाव अहेरात देण्यात आल्यामुळे, बाकळी नदीच्या तीरावर असलेल्या या गावाला अहिरवाडा हे नाव देण्यात आले, असे या भागातील लोक सांगतात. Wardha-Arvi-Bhavani लोअर वर्धा प्रकल्पामुळे अहिरवाडा हे गाव बुडीत क्षेत्रात गेले असले तरी मंदिर उंचावर असल्यामुळे अजूनही त्याच ठिकाणी कायम असून, अश्विन नवरात्र उत्सव व चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. अखंड दीपज्योत दोन्ही नवरात्रांमध्ये लावण्यात येते. स्वयंभू असलेली जगदंबा भवानीची मूर्ती व त्या मंदिर परिसरातील भाग अतिशय सुंदर असल्यामुळे आज मोठ्या संख्येने भाविक दर्शनाचा लाभ घेण्याकरता येत असतात