तळेगाव श्यामजी पंत,
- गोपाल चिकाटे
Wardha-Telai Devi आष्टी तालुक्यातील आष्टी वरुड मध्यप्रदेश मार्गावर आष्टी पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरापासून घाटाला प्रारंभ होतो. सदर घाटाच्या वळणावर पांढुर्णा शहरात जाणाऱ्या रस्त्यावर एक मोठे स्वयंभू तेलाई माता जागरूक देवस्थान आहे. देवस्थानापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर पांढुर्णा गाव असून, आदिवासी समाजाची वस्ती आहे. चारही बाजूने घनदाट जंगल आहे. तेलाई माताही स्वयंभू असून, एका बोरीच्या झाडाखाली प्रगट झाल्याचे सांगतात. दोनशे वर्षाचा काळ झाल्याचे सांगतात. Wardha-Telai Devi पूर्वी जंगलातून दगडधोंड्यातून पायवाट होती. तेथून गावातील आठवडी बाजाराकरिता आष्टीला पायदळ व्यवसायाकरिता जात होते. आष्टी येथील एक तेल विकणारी म्हातारी पांढुर्णा साहूर येथे तेल विकण्याकरिता पायीच त्या बोरीच्या झाडाखालून जात होती व नेहमी मातेच्या अंगावर तेल वाहत होती तेव्हापासून मातेचे नाव तेलाई माता म्हणून नावारूपास आले.Wardha-Telai Devi
Wardha-Telai Devi त्याच परिसरात एक कुंड व हरीने लोट आहे. हरीने लोट उंचावर असून उन्हाळ्यातही भक्ताची तृष्णा भागवतात. येथील काही वयोवृद्ध सांगतात की, उन्हाळ्याच्या दिवसात एक बैलबंडीने लग्नाची वरात जात असताना, त्या बोरीच्या झाडाजवळून जाताना अचानक बैल खाली बसले. प्रयत्न करूनही बैल उठत नसल्याने, वऱ्हाडी मंडळी आश्चर्यचकित झाली. वऱ्हाड्यांनी इकडे तिकडे फेरफटका मारला असता, त्यांना एका बोरीच्या झाडाखाली स्वयंभू देवीचे स्थान आढळले. सर्व वऱ्हाड्यांनी देवीला शरण जाऊन विनंती केली की, तुझ्या डोक्यावर सावली करून देऊ. एवढे बोलून निघाले आणि काय आश्चर्य ! बैल उठले व वऱ्हाड्यांचा प्रवास सुरू झाला. येथील काही भक्त सांगतात की, मध्यरात्री पट्टेदार वाघ मातेच्या दर्शनाला येतो. Wardha-Telai Devi मंदिराच्या गेट जवळ बसून जोरजोराने डरकाळ्या फोडून निघून जातो. ही घटना अनेक भक्तांनी अनुभवल्याचे सांगतात. तेलाई मातेच्या दर्शनाला जाताना आष्टीपासून नऊ वळणाचा चक्री घाट आहे. मातेचे मंदिर डोंगर माथ्यावर आहे. आज या ठिकाणी भक्ताच्या व गावकऱ्यांच्या मदतीतून मातेचे मंदिर, हनुमान मंदिर ,विठ्ठल रुखमाई मंदिर ,संत भाकरे बाबा व गोमाता मूर्ती स्थापित आहेत. भक्तांच्या सोयीकरिता स्वयंपाक गृह, वीज पुरवठा आणि पाण्याची व्यवस्था असून, तिथे स्वयंपाकाचीसुद्धा व्यवस्था आहे. आष्टी पांढुर्णा व परिसरातील भक्तगण श्रद्धेने मदत करतात.
Wardha-Telai Devi आष्टी येथील संत कवी कृष्णा उर्फ दयानंद हिरुळकर यांनी वर्ष १९९० मध्ये तेलाई मातेची आरती रचली. ती आरती सकाळ संध्याकाळ म्हटल्या जाते. तसेच, हिरुळकर यांनी मातेवर भजने लिहिली असून ती प्रकाशित झाली. आज मंदिराची देखभाल दिलीप झामडे व दत्तू परतेती इत्यादी भक्त देखभाल करीत आहेत. तेलाई मातेचे चमत्कार घडल्याने परिसरात प्रसार होत आहे. भर जंगलात तेलाई माता ही उघड्यावर होती. या तेलाई मातेचे अनेकांना दर्शन घडल्याने हळूहळू उघड्यावर असलेली त्यालाही माता आता गावकऱ्यांच्या व भक्ताच्या सहकार्याने मंदिर निर्माण झाले. जंगल परिसर असल्यामुळे येणारे जाणारे प्रवासी तिथे थोडा वेळ विश्रांती घेऊन पुढे निघतात. Wardha-Telai Devi भक्त नवरात्रामध्ये मातेच्या दर्शनाला आवर्जून जातात. पांढुर्णा येथील मातेचे भक्त दत्तू परतेती यांनी सांगितले की, तेलाई माता ही पाच गावाच्या शिवेवर प्रगट झालेली आहे. नवरात्रामध्ये मोठ्या भक्तीभावाने तिथे पूजा होते. परिसरातील आष्टी, बोटोना, साहूर येथून भक्त अनवाणी नवरात्रामध्ये व नेहमी दर्शनाला जातात. नवरात्रामध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात पहाटेपासून रांगा लागतात.