साप्ताहिक राशिभविष्य
मेष (Aries Zodiac) : वार्ता कळतील
Weekly Horoscope : या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील पंचम या शुभ स्थानातून सुरू होत आहे. सुखावह ग्रहस्थितीने या आठवड्याचा प्रारंभ होत आहे. सुखाच्या वार्ता कळतील. चिरस्मरणीय आठवणी साठवून ठेवावयास लावणारा हा काळ आहे. शिक्षण, व्यवसाय, नोकरी अशा विविध आघाड्यांवर आपली सरशी होणार आहे. मुलांकडून सुवार्ता, इच्छुकांना संतती योग, बाजारातील गुंतवणूक, लॉटरी वा तत्सम बाबींतून लाभाचेही योग अनुभवास यावेत. प्रेमसंबंध, विवाह योग जुळून येण्याची शक्यता आहे. जबाबदारीचा ताण कमी होऊन मनातील योजना पूर्णत्वास नेण्यासाठी मोकळीक मिळू शकेल.
शुभ दिनांक - ३०, १, २, ३.
वृषभ (Taurus Zodiac) : संमतीची मोहर उमटणार
या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील चतुर्थ या सुखवर्धक सुरू होत आहे. आर्थिक आघाडीवर सुबत्ता राहण्याची शक्यता असतानाच अचानक मोठ्या खर्चाचेही संकेत मिळत आहेत. तरुण वर्गाला नोकरी-व्यवसायात उत्तम संधी, पगार वाढ, पदोन्नती, भाग्योदयाचे योग यावेत. काहींना मित्रमंडळी वा नातलगांबाबत काळजीजनक वातावरण निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. प्रेमसंबंध, प्रेमविवाह यांना पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याने आपल्या निवडीवर संमतीची मोहर उठविता येऊ शकेल.
शुभ दिनांक - ३०, १, २, ५.
मिथुन (Gemini Zodiac) : कामाचे कौतुक होणार
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील पराक्रम स्थानातून सुरू होत आहे. नोकरीत प्रशंसा, कामाचे कौतुक, वरिष्ठांची मर्जी लाभेल. आपली बाजू वरचढ होत असतानाच मात्र हाताखालच्या काही सहकार्यांकडून असहकाराचे वर्तन घडण्याची शक्यताही निर्माण शकते. त्याकडे दुर्लक्ष करणे अवघड जाईल, तथापि कामाची दिशा, कामाचा झपाटा बदलू न देता आगेकूच करण्यातच हित आहे. त्याचे दूरगामी लाभ मिळतील. विशेषतः शिक्षणासाठी विदेशात जाण्याच्या योजना कुणी आखत असेल तर त्याला मूर्त रूप लाभू शकेल. मुलांचे शिक्षण, नोकरी- व्यवसाय, विवाहसंबंधी कार्ये घडू शकतात.
शुभ दिनांक - २, ३, ५.
कर्क (Cancer Zodiac) : परिश्रमाचे चीज होेईल
या आठवड्याच्या सुरुवातीला आपला राशिस्वामी चंद्र कुंडलीतील धन स्थानातून भ्रमण सुरू करीत आहे. विशेषतः नोकरी-व्यवसायासाठी हा उत्तम काळ आहे. आतापर्यंत घेतलेल्या परिश्रमाचे चीज होेईल. कामाचे कौतुक, नवीन जबाबदारी, पदोन्नती, पगारवाढ, आकर्षक इन्सेंटिव्ह अशा स्वरूपात लाभ पदरी पडण्याची शक्यता आहे. अधिकार्यांची मर्जी आणि सहकार्यांची साथ घरात काही शुभकार्ये ठरण्याची शक्यता असल्यामुळे आनंदात भरच पडेल. आवक वाढेल. अडलेले पैसे मिळतील. भूमी, घर, मोठे वाहन यांच्या खरेदीच्या योजनांना गती मिळू शकेल. तीर्थाटने, सहलीदेखील घडू शकतील. परिश्रमाचे चीज होईल.
शुभ दिनांक - ३०, १, ४, ५.
सिंह (Leo Zodiac) : आर्थिक उन्नती व समाधान
Weekly Horoscope : या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण कुंडलीतील आपल्याच स्थानातून सुरू होत आहे. आर्थिक उन्नतिकारक व कुटुंबात समाधान दर्शविणारा सप्ताह आहे. वाढीव पैसे येतील तेव्हा त्याला अधिकचे पाय फुटण्याची शक्यता राहील. मोठी खरेदी, अचानक लांबचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायातील विरोधक आटोक्यात राहतील. तरुणांना नोकरीच्या संधी लाभू शकतात. किमान त्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना वेग मिळेल. कुटुंबाची उत्तम मिळेल व आपले ईप्सित गाठू शकाल. काही घडामोडी अचंबित करतील. विवाहयोग जुळून येण्यासाठी उपयोगी आठवडा.
शुभ दिनांक - २९, ३०, १, २.
कन्या (Virgo Zodiac) : वरिष्ठांच्या सहवासातून लाभ
या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील व्यय स्थानातून सुरू होत आहे. या आठवड्याचे ग्रहमान नोकरी-व्यवसायात उत्तम संधी, लाभदायक क्षण पदरी पडण्याचे संकेत आहे. तरुण वर्गाला भवितव्य घडविण्यासाठी परिश्रम घ्यायलाच हवेत. महत्त्वाच्या कामांना गती द्या. ओळखीतून तसेच वरिष्ठांच्या सहवासातून लाभ होण्याची शक्यता आहे. वडीलधार्या मंडळीचा सल्ला घ्या. विवाहेच्छू युवावर्गाला चांगले योग यावेत. दुसरीकडे काही कुटुंबात तणावाचे वा चिंतेचे वातावरण निर्माण होऊ शकते. कुटुंबातील भाऊबंदकीची प्रकरणे निस्तारताना पुरेवाट होईल.
शुभ दिनांक - २, ४, ५.
तूळ (Libra Zodiac) : मनस्तापाचे प्रसंग संभव
Weekly Horoscope : या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील लाभ स्थानातून सुरू होत असला, तरी काही मंडळींना जरा तापदायक, मानापमानाच्या कात्रीत अडकवणारा, मनस्तापाचे प्रसंग अनुभवास आणणारा हा आठवडा ठरू शकतो. अतिशय दगदग, धावपळ होणार. हाती घेतलेल्या उपक्रमांना चालना देणारे मानसिक बळ उभारणे आपणास कठीण होणार नेमक्या क्षणी नाचक्की होणार नाही याची काळजी घेऊनच आपल्या कार्यालयीन कामकाजाचे स्वरूप, आपल्या योजना आखावयास हव्यात. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहे. काही चिंताजनक परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शुभ दिनांक - १, २, ४, ५.
वृश्चिक (Scorpio Zodiac) : विश्वास टाकताना सावध
या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील दशम सुरू होत आहे. हा आठवडा काहीसा संघर्षाचा राहील. विशेषतः व्यवसायात असलेल्या मंडळींना जवळच्या वाटणार्या व्यक्तींकडूनच विश्वासघात, भ्रमनिरास असे अनुभव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणावरही विश्वास टाकताना पुरेपूर खातरजमा करून घेणे फायद्याचे ठरेल. काही अफलातून प्रयोगातून हमखास यश, कौतुक, प्रसिद्धी मिळेल. प्रतिष्ठा उंचावेल. कुटुंबात क्षणिक वादाचे प्रसंग संभवतात. टाळण्याचे प्रयत्न करा. जमीन-घरासंबंधीचे व्यवहार, कौटुंबिक वाद वगैरे महिला वर्गाच्या मदतीने पूर्णत्वास जाऊ शकतात.
शुभ दिनांक - ३०, १, ४, ५.
धनु (Sagittarius Zodiac) : नवनवीन संधी लाभणार
Weekly Horoscope : या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील नवम स्थानातून सुरू होत आहे. या आठवड्याचे ग्रहमान नोकरी-व्यवसायात प्रगती, समाजात मान-सन्मान, प्रतिष्ठा उंचावणे असले योग निर्माण करीत सरकारी नोकरीत असलेल्यांना पूर्वार्ध निश्चितच सुखावह व नवीन संधी देणारा असेल. समाजकार्य, राजकारण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांनी लाभ पदरी पाडून घेता येणार. मनासारखी कामे घडतील. विदेशात जाण्याच्या योजना, व्यवसाय विस्ताराचे प्रयत्न, कोर्टातील प्रकरणे यात आपणास सावकाशपणे यश मिळावे. तरुणांना नोकरी, विवाहाचे योग, नवीन घरात स्थलांतराचे योग यावेत.
शुभ - २, ३, ४, ५.
मकर (Capricorn Zodiac) : संपूर्ण सतर्कता आवश्यक
या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील अष्टम या पीडादायक स्थानातून सुरू होत आहे. हा आठवडा कोणतेही नवे धाडस करण्याचा नसून आहे त्यात समाधान मानावयास हवे. कुटुंबात भांडणे होऊ शकतात. ती विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्या. काही विचित्र अपघात, आजारपण, तर काहींना एखादी शस्त्रक्रिया करावी लागण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. उष्णताजन्य त्रास बळावतील. अॅसिडिटी, अपेंडिक्स असले त्रास असणार्यांनी काळजी घ्यावी. चोरी, महत्त्वाच्या वस्तू हरवणे अशा घटना घडू शकतात. संपूर्ण सतर्कताच यावर उत्तम उपाय आहे.
शुभ दिनांक - ३०, १, २, ३.
कुंभ (Aquarius Zodiac) : आपलेच तंगडे गळ्यात
या आठवड्याच्या सुरुवातीला भ्रमण आपल्या कुंडलीतील सप्तम स्थानातून सुरू होत आहे. हा आठवडा काहीसा फसवा व आपलेच तंगडे आपल्या गळ्यात अटकवणारा आहे. त्यामुळे कोणतेही पाऊल उचलताना त्याच्या परिणामांची अगोदरच खात्री करून घेण्याची गरज आहे. आपली वाचाळताच अंगलट येऊ शकते. स्वतःहून ओढवून घेतलेल्या संकटांचे परिणाम भोगावे लागतील. योजना रेंगाळतील. कार्यस्थळी असहकाराचे वातावरण संभव. कारवाया वाढतील. उत्तरार्धात काहीसा दिलासा मिळू शकतो. कौटुंबिक प्रश्न सुटावेत. नोकरीच्या संधी लाभतील. विवाहेच्छू युवक-युवतींना अनुरूप स्थळे लाभावीत.
शुभ दिनांक - १, २, ३, ४.
मीन (Pisces Zodiac) : मनाचा त्रागा वाढणार
Weekly Horoscope : या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील षष्ठ स्थानातून सुरू होत आहे. या आठवड्यात काही चमत्कारिक घटनाक्रम अनुभवास येण्याची शक्यता घरात अकारण भांडणे, भाऊबंदकीतून- वारशाच्या मुद्यावरून विकोपाला जाणारे वाद, आर्थिक देवाण-घेवाणीत फसगत, नोकरी-व्यवसायात स्पर्धा, वरिष्ठांची अवकृपा, नको तेथे नमते घ्यावे लागणे असल्या मनाचा त्रागा वाढविणार्या घटना घडू शकतात. आपल्या कार्यक्षेत्रात आपसात स्पर्धा-विरोधाचे वातावरण राहील. वयस्क व्यक्तींनी प्रकृतीची काळजी घ्यावी. खानपानाचे पथ्य, औषधोपचाराचे वेळापत्रक सांभाळावयास हवे.
शुभ दिनांक - ३०, ४, ५.
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, ८६००१०५७४६