हे न्यायालय आहे, कॉफी शॉप नाही

    दिनांक :30-Sep-2024
Total Views |
- माजी सरन्यायाधीशांविरोधातील याचिकेवर भडकले सरन्यायाधीश
 
नवी दिल्ली, 
हे न्यायालय आहे, कॉफी शॉप नाही. मी हे सहन करणार नाही. माजी सरन्यायाधीशांना प्रतिवादी करून तुम्ही जनहित याचिका कशी दाखल करू शकता? काही तरी प्रतिष्ठा असावी. माजी सरन्यायाधीशाविरुद्ध ‘इन हाऊस' तपास हवा आहे, अशी मागणी तुम्ही करू शकत नाही, अशा शब्दांत सोमवारी Chief Justice Dhananjay Chandrachud सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी याचिकाकर्ता वकिलाला \टकारले. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या विरोधात अंतर्गत चौकशीची मागणी करणारी याचिका २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. याचिकाकर्ते वकील आहेत. आजच्या सुनावणीत धनंजय चंद्रचूड यांनी वकिलांना रंजन गोगोई यांचे नाव वगळण्याची सूचना केली. माजी सरन्यायाधीशांना पक्ष करून तुम्ही जनहित याचिका कशी दाखल करू शकता? काही तरी प्रतिष्ठा असावी, असे त्यांनी सुनावले.
 
 
Dhananjay Chandrachud
 
सुनावणीत याचिकाकर्ता वकिलांनी ‘या...या..,' असा उच्चार केला. यावर सरन्यायाधीशांनी वकिलांना सुनावले. प्रश्नाला उत्तर देताना ‘या...या...;न म्हणता ‘यस' म्हणा. हे कॉफी शॉप नाही. हा शब्द मला आवडत नाही. न्यायालयात याची परवानगी देता येणार नाही. यावेळी वकिलांनी आपण महाराष्ट्राचे असल्याचे सांगितले. यानंतर सरन्यायाधीशांनी संबंधित वकिलांना मराठीत समजावण्याचा प्रयत्न केला.
 
 
गोगोई आता निवृत्त झाले आहेत. आम्ही अशा तपासाचा आदेश देऊ शकत नाही. यावर याचिकाकर्ता वकिलांनी सांगितले की, मी केलेली मागणी योग्य आहे. कायदाही माझ्या बाजूने आहे. तत्कालीन सरन्यायाधीशांना माझी पुनर्विचार याचिका कामगार कायद्यांशी संबंधित असलेल्या खंडपीठासमोर मांडण्याची विनंती केली होती; पण तसे झाले नाही. टाळण्यात आली. यावर Chief Justice Dhananjay Chandrachud धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले की, रजिस्ट्री या याचिकेवर विचार करेल. सध्या तुमच्या अर्जातून रंजन गोगोई यांचे नाव काढले जात आहे.