- बिहारमधील पूरस्थिती गंभीर
पाटणा,
Dams of Kosi and Bagmati rivers दरभंगा जिल्ह्यातील कोसी नदी व सीतामढी येथील बागमती नदीचे बंधारे फुटल्यामुळे बिहारच्या अनेक भागांमध्ये सोमवारी पूरस्थिती आणखीच बिकट झाली. रविवारी दरभंगामधील कीर्तरपूर व घनश्यामपूर गावांना पूर आला आणि सीतामढी जिल्ह्यातील रुन्नी सैदपूर विभागात बागमती नदीच्या बंधार्यातून गळती होत असल्याची माहिती मिळाली, असे अधिकार्यांनी सांगितले. बंधार्यांना भेगा पडल्यामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे, पण ती नियंत्रणात आहे. घाबरण्याचे कारण नाही. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभाग युद्धपातळीवर काम करीत आहेत, असे ते म्हणाले.
Dams of Kosi and Bagmati rivers राज्याच्या विविध भागांतून आतापर्यंत बंधारा फुटण्याच्या एकूण सहा घटना नोंदविण्यात आल्या. त्यापैकी काहींची दुरुस्ती करण्यात आली आणि इतरांसाठी काम सुरू आहे, असे जलसंपदा मंत्री विजय कुमार चौधरी यांनी सोमवारी सांगितले. सीतामढी येथील मधकौल गावातील बागमती नदीचा तटबंध आणि पश्चिम चंपारणमधील गंडक नदीच्या तटबंदीला पाण्याच्या जास्त दाबामुळे नुकसान झाले आहे; परिणामी वाल्मीकि व्याघ्र प्रकल्पात पाणी घुसले आहे, असे अन्य एका अधिकार्याने सांगितले. दरभंगामधील वाल्मीकिनगर आणि किरतपूर येथून बंधार्यांवरून पाणी वाहत असल्याचे सांगण्यात आता अनेक नद्यांमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे.