महाविकास आघाडीच्या भुलथापांना बळी पडू नका

30 Sep 2024 20:25:06
गडचिरोली, 
राज्यातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे सरकार आदिवासी बांधवांच्या कल्याणाच्या विविध योजना राबवित असून हे सरकार आदिवासी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असे असताना महाविकास आघाडीचे नेते सरकारच्या विरोधात संभ्रम निर्माण करून आदिवासी जनतेला भुलथापा देण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या भुलथापांना आदिवासी बांधवांनी बळी पडू नये, असे आवाहन आमदार Dr. Devrao Holi डॉ. देवराव होळी यांनी केले.
 
 
Dr. Devrao Holi
 
धानोरा तालुक्यातील खरगी येथील आदिवासी समाज बांधवांच्या मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित बांधवांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर गडचिरोली पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव इचोडकर, पेंढरीचे सरपंच पप्पू येरमे, सरपंच परमेश्‍वर गावडे यांच्यासह ग्रामसभांचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
पुढे बोलताना आमदार Dr. Devrao Holi होळी यांनी मागील 2 वर्षाच्या काळात महायुतीच्या सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नवीन वस्तीगृहांची उभारणी, उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत, सर्वांना घरकुल, मोहफुलाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय, गौण वन उपजातून आदिवासी बांधवांना योग्य मोबदला मिळावा यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे सांगितले. महायुतीचे सरकार कल्याणकारी सरकार असून या सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आदिवासी बांधवांना अनेक खोट्या बाबी सांगून भडकाविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आदिवासी बांधवानी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भूलथापांना येणार्‍या कालावधीत बळी पडू नये, असे आवाहन केले.
Powered By Sangraha 9.0