कोळशापासून मुक्तीसाठी भारताला लागेल आणखी वेळ

    दिनांक :30-Sep-2024
Total Views |
- तज्ज्ञांचे मत
 
नवी दिल्ली, 
India : freed from coal ब्रिटनने सोमवारी आपला शेवटचा औष्णिक वीज प्रकल्प बंद केला. मात्र, मिश्र ऊर्जेसाठी भारतात पुढील काही दशके कोळशाचाच वापर केला जाईल. हा विकसनशील देश असून, त्याला ऊर्जेची अतिशय गरज असल्याने या देशाला कोळशापासून दूर जाण्यासाठी आणखी काही वेळ लागेल, असे तज्ज्ञांनी सांगितले.
 
 
coal free India
 
ब्रिटनने सोमवारी कोळशावरील आधारित शेवटचा औष्णिक वीजप्रकल्प बंद केला. यासह हा देश २०४० पर्यंत कोळसामुक्त ऊर्जा व्यवस्था व्हावी, असे आाहन जी-७ देशांनी केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देणारा हा पहिला देश ठरला आहे. जगातील पहिला कोळशावरील आधारित ऊर्जाप्रकल्प लंडन येथे १८८२ मध्ये सुरू झाला. २०१२ पर्यंत ब्रिटनमधील एकूण वीजनिर्मितीपैकी ३९ टक्के वीजनिर्मितीत कोळशाचा वापर केला जायचा.
 
 
India : freed from coal ब्रिटनमधील शेवटचा कोळसा प्रकल्प बंद झाल्याचा अर्थ असा आहे की, ओईसीडी देशांपैकी एकतृतीयांश देश आता कोळसामुक्त आहेत. २०३० पर्यंत तीनचतुर्थांश कोळसा नष्ट करणे अपेक्षित आहे. जागतिक हवामानाच्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट आहे, असे जागतिक ऊर्जेवरील थिंक टँक एम्बरने सांगितले. वीजनिर्मितीसाठी कोळशाचा वापर करण्यात भारत चीननंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे. २०२३-२४ या कालावधीत चीनमध्ये कोळसा जाळून वीजनिर्मितीचे प्रमाण २०१९-२० च्या तुलनेत ७५ टक्क्यांनी वाढले. २०१९-२० मध्ये हे ७१ टक्के होते. २०२३ मध्ये युरोप आणि अमेरिकेत कोळशाच्या वापराचे प्रमाण घटले, तर भारतात ८ टक्के आणि चीनमध्ये ५ टक्क्यांनी वाढले.