- एकाची लष्कराकडून सुटका
इम्फाळ,
Indian Army Manipur मणिपुरात तीन युवकांचे अपहरण करण्यात आले. लष्कराने यापैकी एकाची सुटका केली. उर्वरित दोघांच्या सुटकेसाठी सुरक्षा दल प्रयत्न करीत आहे. तीन दिवसांपूर्वी कांगपोक्पी जिल्ह्यात सशस्त्र व्यक्तींनी या युवकांचे अपहरण केले होते, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.
दोन मित्रांसह एन. जॉन्सन सिह नावाचा युवक पश्मिम इम्फाळ जिल्ह्यातील कैथलमानबी येथे केंद्रीय दलांच्या भरती परीक्षेसाठी गेला होता. त्यावेळी या तिघांचेही कुकींचे प्रभुत्व असलेल्या कांगपोप्की येथून अपहरण करण्यात आले. यापैकी एन. जॉन्सन qसहची लष्कराने सुटका केली, अशी माहिती पोलिस अधिकाèयाने दिली.
Indian Army Manipur हे तिघेही थौबल जिल्ह्यातील आहेत. एन. जॉन्सन सिह सुरक्षित असून, त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले, तर थोइथोइबा सिह आणि ओ. थोइथोइ सिह अद्याप बेपत्ता आहेत. या दोन युवकांचे कांगपोक्पी जिल्ह्यातून २७ सप्टेंबर रोजी समाजकंटकांनी अपहरण केले, त्यांची सुटका करण्यासाठी सुरक्षा दल सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे. बेपत्ता असल्याची तक्रार युवकांच्या कुटुंबीयांनी दिली होती. राज्य आणि केंद्रीय दल त्यांचा शोध घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी एक चित्रफीत प्रसारित करण्यात आली. त्यात आपली सुटका करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एन, बिरेनसिह यांना करताना दोन्ही युवक दिसत आहेत.
युवकांच्या सुटकेसाठी निर्देश : एन. बिरेनसिह
अपहृत युवकांची सुटका करण्यात यावी, असा निर्देश पोलिस महासंचालकांना देण्यात आल्याचे बिरेनसिह यांनी सोमवारी म्हणाले. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. एका युवकाची सुटका झाली असली, तरी दोघे बंडखोरांच्या ताब्यात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी चर्चा सुरू असल्याचे बिरेनसिह यांनी सांगितले.