कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ

    दिनांक :30-Sep-2024
Total Views |
- अनुकंपा धोरणही लागू
- राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
 
मुंबई, 
Maharashtra Govt. decision राज्यातील कोतवालांच्या मानधनात टक्के वाढ करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यावेळी कोतवाल संवर्गातील कर्मचार्‍यांना अनुकंपा धोरण लागू करण्यासही मंजुरी देण्यात आली. राज्यातील १२ हजार ७९३ कोतवालांना याचा लाभ मिळणार आहे. त्यांना मिळणार्‍या १५ हजार रुपये इतक्या मानधनात ही वाढ देण्यात येईल. सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा गंभीर आजार, अपघात असमर्थ ठरल्यास शासनाच्या अनुकंपा धोरणानुसार त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यासही मंजुरी देण्यात आल्याने, हा निर्णय हा कोतवालांच्या कुटुंबासाठी मोठा लाभदायी ठरला आहे.
 
 
shinde
ग्राम रोजगार सेवकांना दरमहा ८ हजार मानधन
राज्यातील ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. ग्रामपातळीवर ज्या ग्रामरोजगार सेवकांनी हजार पेक्षा जास्त दिवस काम पूर्ण केले आहेत. त्यांना मजुरी खर्चाच्या एक टक्का प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल. दोन हजार दिवसांपर्यंत काम केलेल्या ग्रामरोजगार सेवकांना दर महिना एक हजार रुपये व दोन हजार एक पेक्षा जास्त दिवस काम करणार्‍या ग्राम रोजगार सेवकांना दरमहा दोन हजार रुपये प्रवास भत्ता व डेटा अनुदान देण्यात येणार आहे.
देशी गाईंच्या पालनपोषणासाठी अनुदान
Maharashtra Govt. decision राज्यातील गोशाळांमधील देशी गाईंच्या पालनपोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने, त्यांना बळकट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र आयोगाकडून करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल. २०१९ मधील २० व्या पशुगणनेनुसार देशी गाईंची संख्या ४६ लाख १३ हजार ६३२ इतकी कमी असल्याचे आढळून आले आहे. ही संख्या १९ व्या पशुगणनेशी तुलना करता २०.६९ टक्क्यांनी कमी झाली आहे.