यंदा देशभरात सरासरीच्या आठ टक्के जास्त पाऊस

    दिनांक :30-Sep-2024
Total Views |
- २०२० नंतर सर्वाधिक 
 
नवी दिल्ली, 
heavy rain यंदाच्या वर्षातील नैर्ऋत्य पावसाचा मोसम सोमवारी अधिकृतरीत्या संपला. यंदा देशात ९३४.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. हा दीर्घ कालावधीतील सरासरीच्या १०८ टक्के झाला तसेच २०२० नंतरचा उच्चांकी पाऊस झाल्याचे भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.
 
 
 
heavy rain
 
heavy rain दीर्घकालीन सरासरीपेक्षा १९ टक्के जास्त पाऊस यंदा मध्य भारतात झाला. द्वीपकल्पात १४ टक्के, तर वायव्य भारतात सरासरीपेक्षा ७ टक्के जास्त पाऊस झाला. पूर्व आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा १४ टक्के कमी पाऊस झाला. देशाने जूनमध्ये ११ टक्के पावसाची तूट अनुभवली, त्यानंतर जुलैमध्ये ९ टक्के, ऑगस्टमध्ये १५.७ टक्के आणि सप्टेंबरमध्ये १०.६ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला. २०२३ च्या पावसाळ्यात भारतात ८२० मिमी नोंद झाली होती. ती ८६८.६ मिमी दीर्घकालीन सरासरीच्या ९४.४ टक्के जास्त होती. २०२२ मध्ये देशात ९२५ मिमी पावसाची नोंद झाली. दीर्घकालीन सरासरीपेक्षा ही १०६ टक्के जास्त आहे. २०२० मध्ये ९५८ मिमी पाऊस झाला होता.
 
 
अंदाज ठरले अचूूक
यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. भारतात सरासरीपेक्षा कमी, वायव्य भारतात सामान्य आणि मध्य भारत व दक्षिण द्वीपकल्पात सामान्यपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अचूक अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.