अजनी स्थानकाचे २ प्लॅटफॉर्म ९० दिवस

    दिनांक :04-Sep-2024
Total Views |
- पॉवर ब्लॉकचे १२ सप्टेंबरपासून नियोजन
 
नागपूर,
Ajni Railway Station : मध्यवर्ती रेल्वेच्या नागपूर स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी आता अजनी रेल्वे स्थानकावर महत्त्वपूर्ण वाहतूक आणि पॉवर ब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. स्थानक परिसरात विविध विकास कामे पूर्ण करण्यासाठी १२ सप्टेंबर पासून अजनी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ क्रमांकाचा प्लॅटफॉर्म ९० दिवसांच्या बंद राहणार आहे. दरम्यानच्या कालावधीत रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. तसेच याच कालावधीत नागपूरहून सेवाग्राम आणि वर्ध्याकडे जाणार्‍या गाड्या अजनी स्थानकावर थांबणार नाहीत. नागपूरच्या दिशेने येणार्‍या गाड्या नियमित वेळापत्रकानुसार अजनी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर थांबतील. तसेच विकास कामांसाठी रेल्वेकडून ब्लॉक घेतल्या जाईल, तेव्हा २ प्लॅटफॉर्म बंद राहणार असून प्लॅटफॉर्म १ मात्र कार्यरत राहील. रेल्वेगाड्याच्या सुरुवातीचे स्थानक आणि अंतिम स्थानकात बदल करण्यात आला आहे.
 
 
Ajni Railway
 
Ajni Railway Station : ब्लॉक कालावधीत खालील गाड्या अजनी स्थानकाऐवजी नागपूर स्थानकावरून निघतील आणि संपतील. यात प्रामुख्याने गाडी क्रमांक १२१२०/१२११९ अजनी - अमरावती - अजनी एक्सप्रेस (दैनिक)
गाडी २२१२४/२२१२३ अजनी - पुणे - अजनी एक्सप्रेस (मंगळवार आणि शनिवार) तसेच क्रमांक २२१४०/२२१३९ अजनी - पुणे - अजनी एक्सप्रेस (रविवार) या गाड्या अजनी स्थानकावर थांबणार नाहीत.
ब्लॉक कालावधीत अजनी स्थानकावर खालील ८ गाड्या थांबणार नाहीत:
ट्रेन क्रमांक ११०४० महाराष्ट्र एक्सप्रेस (दैनिक) गाडी क्रमांक ११४०३ नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेस (मंगळवार, शनिवार), गाडी १२१०६ गोंदिया - सीएसएमटी विदर्भ एक्सप्रेस (दैनिक), गाडी क्रमांक १२१३६ नागपूर पुणे एक्सप्रेस (सोमवार, बुधवार, शनिवार), गाडी क्र. १२११४ नागपूर - पुणे गरीब्रथ एक्सप्रेस (मंगळवार, शुक्रवार, रविवार), गाडी क्र. १२१४० नागपूर - सीएसएमटी सेवाग्राम एक्सप्रेस (दैनिक), गाडी क्र. ०१३७४ नागपूर - वर्धा मेमू (रविवार वगळता), गाडी क्र. १८०३० - एलटीटी एक्सप्रेस (दैनिक)
रेल्वे प्रवाशांनी वरील ट्रेन अजनीऐवजी मुख्य रेल्वे स्थानक प्रवासाची सुरुवात करावी. प्रवाशांच्या सुविधाकरिता अजनी स्थानकाचा कायापालट केल्या जात आहे. विविध सुविधा आणि कनेक्टिव्हिटी वाढवणारे हे महत्त्वाचे विकास कामे पूर्ण करण्यासाठी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.