माहुरच्या श्री रेणुका मंदिराची प्रतिकृती यंदाच्या संती गणेशोत्सवात

Replica of Sri Renuka Temple

    दिनांक :04-Sep-2024
Total Views |
नागपूर, 
Replica of Sri Renuka Temple : दारोडकर चौक, इतवारी हायस्कूलजवळील श्री संती गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने यंदा माहुरच्या श्री रेणुका मंदिराची प्रतिकृती मुख्य आकर्षण राहणार असल्याची माहिती संती गणेशोत्सवाचे संयोजक संजय चिंचोले यांनी पत्रपरिषदेत दिली. आ. गिरीश व्यास,राकेश भावळकर, राजकुमार गुप्ता, गोपेश तुरकार, राजेश श्रीमानकर, दिनेश चावरे, अखिल वलोकार, हृदेश दुबे, मंगेश वड्याळकर आदी पत्रपरिषदेत उपस्थित होते.
 
 
Sri Renuka Temple
 
संती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृती तयार करून भाविकांना प्रत्यक्षात दर्शनाचा लाभ दिल्या जातो.यावर्षी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक श्री रेणुकादेवी मंदिर, माहूर, जिल्हा नांदेड या मंदिराची हुबेहुब प्रतिकृती साकार करण्यात आली आहे. हे मंदिर २५ फूट उंचीवर साकारण्यात आले असून जवळपास ५१ पायर्‍या चढल्यानंतर गडावर देवीचे दर्शन होणार आहे. याशिवाय श्री तुळजा भवानी, श्री जमदग्नी व भगवान परशुरामाचे सुद्धा दर्शन होणार आहे. श्री रेणुका देवीची सकाळी व संध्याकाळी होणारी पारंपारिक आरती, रोज होणारा श्रृंगार, आरती, प्रसाद, तांबुल तसेच रेणुका देवीच्या साक्षात दर्शनाचा लाभ नागपूरकरांना व्हावा याच उद्देश्याने श्री रेणुका देवीची प्रतिकृती तयार करण्यात येत आहे. गणेशभक्तांना श्री रेणुका देवीच्या दर्शनासोबतच तेथील प्राचीन इतिहास, परंपरा, संस्कृती, पुजापाठ, प्रसादाचा लाभ होणार आहे. आपण जणूकाय माहुरला येवून साक्षात श्री रेणुका देवीचेच दर्शन घेत असल्याचे संपूर्ण वातावरण राहणार आहे. रेणुका मंदिरात होणारी दररोजची आरती व प्रसाद येथे मिळणार आहे. देवीचा अभिषेक पुजार्‍यांच्या हस्ते करता येणार आहे.
 
 
Replica of Sri Renuka Temple : विशेषतः महिलांसाठी देवीची ओटी भरण्याची व्यवस्था करण्यात आली असून भक्तांना विडयाचा प्रसाद दिल्या जातो. तोच प्रसाद माहुर येथील श्री पांडुरंग राठोड तांबुलवाले व त्यांचे सहकारी १० दिवस तयार करणार आहे. दिवशीच्या मिरवणुकीत शिवमुद्रा गजवक्र ढोलताशा पथकाच्या जवळपास ५०० वादकांच्या गजरात श्रींचे दुपारी २ वाजता आगमन होणार आहे. गणेशोत्सवादरम्यान विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात चित्रकला, निबंध स्पर्धा, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, उखाणे आदी स्पर्धा घेतल्या जाणार असल्याची माहिती मनिषा खोत, श्रध्दा पाठक यांनी दिली. श्री संती गणेशोत्सव व सांस्कृतिक १९५८ साली गणेशोत्सवाची सुरूवात केली.