नागपूर ,
Government Press Colony शासकीय प्रेस कॉलनी रविवारी पार्किंगग्रस्त असते. रविवारी बाजार चौकालगत मोठ्या प्रमाणात आठवडी बाजार भरत असतो. अगदी सिमेंट रोडला धरूनच असलेल्या मोकळ्या मोकाट मैदानात बाजार लागतो. त्यातील अर्धे पटांगण रिकामे राहते. परंतु तिथे पार्किंगची कोणतीच व्यवस्था नाही. सर्व वाहनधारक आपली वाहने सिमेंट रोडच्या दुस-या बाजूला असलेल्या शासकीय प्रेस काँलनीत लावतात. बाजार सकाळी ७ ते रात्री १ १ वाजेपर्यंत भरत असतो. दुपारी ३ पासून ते रात्री १ ० पर्यंत विशेषत: दुचाकी वाहनधारकांचे आवागमन सुरूच असते. परिणामी नागरिक त्रस्त आहेत.
या कॉलनीमधील गल्ल्यातील रस्ते खूप अरुंद आहेत. वस्तीत अंदाजे १ ० ते १ २ फुटांचे रस्ते आहेत. त्यातही ३ ते ४ फुटांचे फुटपाथ वगळल्यास उर्वरित ६ ते ८ फुटाचीच जागा शिल्लक उरते.Government Press Colony यात वाहनधारकांच्या वापराने या काँलनीत गैरसोय निर्माण होते. बाजार सभोवतालच्या सुर्वे नगर, प्रसादनगर, आनंदनगर आदी वस्त्यांपेक्षा ही काँलनी अधिक अडचणीत आहे.लक्ष्मीनगर झोन अधिकारी, मनपा बाजार विभाग, वाहतूक विभाग, पोलिस विभाग, नगरसेवक व संबंधित अधिकारी यांनी त्वरित काँलनीतील मनमानी पार्किंग हटवून मैदानात वा अन्यत्र नियोजनबद्ध व्यवस्था करावी अशी मागणी अरुणा रामटेके, मिलिंद रेलकर, समीर साखरकर, डी. एस. सातपुते, तानाजी पाटील इ. नागरिकांनी केलेली आहे.
सौजन्य :डॉ. प्रभुदास रामटेके,संपर्क मित्र