वेध
- विजय कुळकर्णी
संजोली परिसरात एक मशीद बांधण्यात आली. बांधकाम करण्यात आलेली जागा हिंदुबहुल भागात व शासकीय जागेवर आहे. ही जमीन वक्फची असल्याचे सांगितले जाते. या मशिदीत मोठ्या संख्येत मुस्लिम वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे या मशीद परिसरात वास्तव्यास असलेल्या हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ही मशीद पाडण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. दोन दिवसांपासून या मागणीसाठी शेकडो हिंदूंनी रस्त्यावर उतरून धरणे दिली. या घटनेवरून लव्ह जिहाद, व्होट जिहाद आणि आता Land Jihad लॅण्ड जिहाद होत असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे हिमाचलमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. सुखविंदरसिंह सुख्खू हे मुख्यमंत्री आहेत. तर, मशीदच्या अवैध बांधकामाचा मुद्दा काँग्रेसचेच मंत्री अनिरुद्धसिंह यांनी केला. विधानसभेत त्यांनी या अवैध बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार या मशिदीचे बांधकाम शासकीय जागेवर करण्यात आले आहे. तसेच अडीच मजल्यांचीच परवानगी असताना सहा मजले बांधण्यात आले आहेत. त्यामुळे हे बांधकाम पाडण्यात यावे. बांधकाम अवैध असेल तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे. मग, ते मंदिर असो की मशीद, त्यांची मागणी आहे. त्यांच्या या मागणीनंतर हजारो हिंदू या मशीद परिसरात रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी झाले.
Land Jihad : आज ज्या ठिकाणी ही मशीद उभी आहे तेथे केवळ तळमजला होता. त्याचे छत टिनपत्र्याचे होते. तेथे मो. सलिम नावाचा एक टेलर काही वर्षांपूर्वी एकटाच राहत होता. हळूहळू तेथे पक्के बांधकाम करण्यात आले. यावर मध्ये हरकत घेण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले आणि मशिदीचे बांधकाम बंद करण्यात आले. त्यानंतर कोरोनामध्ये हे बांधकाम करण्यात आले. २०२२ मध्ये काँग्रेसची सत्ता हिमाचलमध्ये आली. मात्र, मुख्यमंत्री सुख्खू यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही वर्षांपूर्वी एक व्यक्ती एकटीच तळमजल्यावर राहत होती. तेथे शेकडो लोक राहतात. याचा अर्थ त्या इमारतीत बाहेरून आलेल्या लोकांना राहण्याची सोय उपलब्ध करून दिली जात आहे. तर, मशिदीच्या शेजारी राहणार्या नागरिकांचे म्हणणे आहे की, ही शासकीय जागा हडपण्याचा प्रयत्न आहे. शिमलामध्ये अडीच मजल्याच्यावर बांधकाम करण्यास मनाई आहे. एनजीटी म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने अडीच मजल्यापेक्षा जास्त मजले बांधण्यास केली आहे. मात्र, ही मशीद सहा मजली बांधण्यात आली आहे.
Land Jihad : सर्वांना अडीच मजल्यापेक्षा जास्त बांधकाम करण्यास मनाई असताना या मशीद बांधकामाला विशेष सूट का? असे आंदोलक विचारत आहेत. या मशिदीत मोठ्या संख्येत मुस्लिम समुदायाचे लोक वास्तव्यास बाहेरून आल्यामुळे या परिसरातील हिंदूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. हे सर्वजण तेथे राहण्यास का आले, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. संपूर्ण शिमला शहरात हा नंगानाच सुरू आहे. शासनानेदेखील हे बांधकाम अवैध असल्याचे स्पष्ट केल्यानंतरही त्यावर कारवाई का नाही, असाही प्रश्न शिमलाचे नागरिक उपस्थित करीत आहेत. हिमाचलचे मंत्री अनिरुद्धसिंह यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सर्व हिंदू पुन्हा जागरूक झाले आणि त्यांनी या बांधकामाविरोधात आंदोलन सुरू केले. यावर मुख्यमंत्री सुख्खू यांचे सरकार काय कारवाई करते, याकडे हिमाचल प्रदेशचे लक्ष लागले आहे. या प्रश्नाचे उत्तर कालांतराने मिळेलच. पण, सुख्खू सरकारवर हे नवीन संकट कोसळले आहे. हिमाचलची आर्थिक परिस्थिती डामाडोल झाली आहे. सरकारकडे राज्य सरकारी कर्मचार्यांचे वेतन व पेन्शन देण्यासाठी पैसे नाहीत. वेतन देणे केले होते. तर, अवैध मशीद बांधकामाची नवीन समस्या या सरकारपुढे उभी ठाकली आहे. तेव्हा, मुख्यमंत्री हा मुद्दा कसा हाताळतात याकडे हिमाचल प्रदेशच्या जनतेचे लक्ष लागून आहे. या मुद्यावरून देवभूमी तापली आहे. हिंदू आता जागरूक झाला आहे. आपल्या समस्या सोडविण्यासाठी तो रस्त्यावर उतरला आहे, हे मात्र खरे!
- ८८०६००६१४९