गडचिरोली,
दंडकारण्य sane guruji prerna project award शिक्षण संस्था गडचिरोलीद्वारा संचालित कमलताई मुनघाटे विद्यालयातील इयत्ता 10 वी ची विद्यार्थिनी साक्षी संजय ठाकरे हिची पुणे येथील राष्ट्रसेवा दलाच्या वतीने आयोजित साने गुरुजी प्रेरणा प्रकल्प पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सदर पुरस्कारासाठी राष्ट्रसेवा दल आणि अन्नपूर्णा परिवार पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरूजी यांच्या 125 व्या जयंती निमित्त्याने संपूर्ण राज्यभर वर्ग 9 ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी साने गुरूजी प्रेरणा-प्रकल्प स्पर्धा राज्यातील सहा प्रशासकीय विभागात आयोजित केली होती. ही स्पर्धा ‘स्वत:चा परिचय, साने गुरुजींच्या कोणत्याही एका पुस्तकाचा परिचय आणि स्वत:च्या आजुबाजूच्या परिसराचा परिचय, समस्या व उपाय’ अशा तीन विभागावर एक विशेष प्रकल्प तयार करण्याची स्पर्धा होती.
साक्षी संजय ठाकरे sane guruji prerna project award हिने तिन्ही विभागावर आधारित सर्वोत्कृष्ठ प्रकल्प सादर करून नागपूर विभागातील समाविष्ठ सहा जिल्ह्यातून तिच्या प्रकल्पाची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.सदर पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, प्रकल्पाच्या प्रमुख मार्गदर्शिका तथा शाळेच्या प्राचार्या स्मिता लडके आणि आपल्या आई - वडिलांना दिले आहे.