- डॉ. ए.एस. सुबीर मुखर्जी यांचे आवाहन
- सामाजिक कार्यकर्त्यांना विदर्भ भूषण पुरस्कार
नागपूर,
Dr. A.S. Subir Mukherjee : देशाच्या रक्षणासाठी कोणत्याही संकटाची पर्वा न करता सीमेवर लढणार सैनिक हाच खरा सेवक आहे. अशा सैनिकांकडून सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन माजी वायुसेना स्क्वाड्रन लीडर ए.एस. सुबीर मुखर्जी यांनी केले. विद्या भूषण फाउंडेशनव्दारे सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर कृषी तज्ज्ञ डॉ रमेश ठाकरे, प्रमुख पाहुणे म्हणून माजी खा. गेव्ह आवारी, प्रदीप आगलावे, ज्ञानेश्वर रक्षक, विद्याभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भूषण भस्मे, पूजा भस्मे आदींची विशेष उपस्थिती होती.
छत्रपती चौक, उर्वेला येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यात २८ सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. राधाकृष्ण हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष गोविंद पोद्दार यांच्यासह दिगांबर आळशी, जानबा मस्के, मेहूल कोसुरकर, संपत तिडके, आरती शेंडे, स्मिता चौधरी आदींचा विदर्भ भूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
Dr. A.S. Subir Mukherjee : देशाचा सैनिक देशसेवा याच भावनेने देशाची सेवा करत असतो. वेळप्रसंगी तो प्राणांची बाजी लावतो. अशा सैनिकांचा सन्मान सामाजिक कार्यात होत आहे. देशाचे रक्षण ही आपली जबाबदारी आहे, तसेच सामाजिक सेवा कार्य ही सुध्दा प्रत्येकांची जबाबदारी असल्याने यात सर्वांचे योगदान असावेत, असेही मुखर्जी यांनी सांगितले. प्रास्ताविक भूषण भस्मे यांनी केले तर रंगराज गोस्वामी, रोशनी वैरागडे आणि आभार पूजा भस्मे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश हाडके, रमेश चहारे, अमर बागडे, राजेश्री बागडे, अमित भस्मे, नुपूर भस्मे आदींनी परिश्रम घेतले.