भारतीयांना व्हिसाशिवाय ५७ देशांमध्ये करता येणार प्रवास

    दिनांक :10-Jan-2025
Total Views |
- जगातील सर्वांत शक्तिशाली पासपोर्टची रँकिंग जाहीर
 
नवी दिल्ली, 
Indian passport : हेन्ली ग्लोबल जागतिक संस्थेने जगातील सर्वांत शक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर केली आहे. यात भारत ८४ व्या स्थानावर असून, पहिल्या स्थानावर सिंगापूर पाकिस्तान १०३ व्या क्रमांकावर असून, उत्तर कोरियापेक्षाही रँकिंग घसरली आहे. रँकिंगनुसार, भारतीयांना व्हिसाशिवाय ५७ देशांमध्ये प्रवास करता येईल.
 
 

passport
 
Indian passport : यात अंगोला, भूतान, बोलिव्हिया, फिजी, हैती, कझाकस्तान, केनिया, मॉरिशस, कतार, श्रीलंका आदी देशांचा समावेश आहे. रँकिंग ठरवण्याचे सूत्र म्हणजे पासपोर्ट असलेली व्यक्ती व्हिसाशिवाय किती देशांना भेट देऊ शकतात, हे असते. यादीत अव्वलस्थानावर असून, या देशातील लोक जगातील १९५ देशांमध्ये व्हिसाशिवाय किंवा व्हिसा ऑन अरायव्हल सुविधेसह प्रवास करू शकतात. २०२३ सोडले तर २०२१ पासून आतापर्यंत सिंगापूर या यादीत अव्वल स्थानावर आहे. २०२४ मध्ये फ‘ान्स, जर्मनी, इटली, जपान आणि स्पेनला संयुक्तपणे पहिले स्थान मिळाले.
 
 
जपानची रँकिंग घसरली, सिंगापूर अव्वल
शक्तिशाली पासपोर्टच्या जपानने नेहमीच सिंगापूरला टक्कर दिली आहे. यावर्षी जपानला दुसरा क्रमांक मिळाला असून, सिंगापूर पहिल्या स्थानावर आहे. जपानी पासपोर्टधारकांना व्हिसाशिवाय १९३ देशांमध्ये प्रवास करता येईल. या वर्षी भारताचे रँकिंग ५ स्थानांनी घसरले. या यादीत भारताला ८५ वे स्थान मिळाले आहे. गेल्या वर्षी भारत ८० व्या स्थानावर होता. २०२३ मध्ये भारताचे ८४, २०२२ मध्ये ८३, २०२१ मध्ये ९०, २०२० मध्ये ८२ आणि २०१९ मध्येही ८२ होते.