- गारवा कायम
- किमान ९.० अंश सेल्सिअस
नागपूर,
Nagpur coldest : विदर्भात सर्वाधिक थंडी नागपूर शहरात असून गारवा कायम असल्याने थंडीची जाणीव होत आहे. उत्तर भारतातील बहुतेक राज्यात थंडी वाढली असून नागपूरसह विदर्भात थंड लाटेची स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी कमाल तापमान २८.६ अंश सेल्सिअस तर किमान ९.० अंश सेल्सिअस नोंदवले. थंडगार वार्यामुळे नागपूरकरांना घराबाहेर फिरणे कठीण झाले आहे.
Nagpur coldest : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस अशीच थंडी कायम आहे. नागपूर शिवाय गोंदिया येथे ९.९ व ब्रम्हपुरीत तापमान १०.० अंशावर तर वर्धा १०.५ अंशावर घसरले आहे. विशेष म्हणजे दिवसाही किमान थंडीची जाणीव होत आहे. नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यात कमाल व किमान तापमान खाली घसरले आहे.