वाशीम,
Beed Sarpanch Santosh Deshmukh : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निदर्यीपणे क्रुर हत्या करण्यात आली. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. तसेच सोमनाथ सुर्यवंशी या युवकाच्या पोलिस कोठडीतील मृत्यूप्रकरणी पोलिसांना सहआरोपी करावे, या मागणीसाठी वाशीममध्ये सर्वधर्मीय, सर्व पक्षीय, सर्व जातीय मुकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढून मागण्याचे निवेदन दिले.

सदर मोर्चाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण करुन करण्यात आली. सदर मोर्चा पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक, तहसील कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, अकोला नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. Beed Sarpanch Santosh Deshmukh यावेळी जिल्हाधिकार्यांना विविध मागण्याचे निवेदन दिले. बीड जिल्ह्यातील केज तालुयातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील ७ आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरीत गुन्हेगारांना त्वरीत अटक करुन फाशीची शिक्षा देण्यात यावी व याप्रकरणाचा मुख्य सुत्रधार वाल्मीक कराड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अभय देणारे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंढे यांचा राजीनामा घेण्यात यावा.
संतोश देशमुख यांच्या मारेकर्यांना त्वरीत फाशीची शिक्षा द्यावी, खंडणीतील आरोपीवर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा. वाल्मीक कराड यांच्यावर वरदहस्त असणार्या राजकीय मंडळीची एस. आय. टी. चौकशी करण्यात यावी. कर्तव्यात कसुर करणार्या पोलिस अधिकारी व कर्मचार्यांना बडतर्फ व सहआरोपी करुन गुन्हा दाखल करण्यात यावा. Beed Sarpanch Santosh Deshmukh एस.आय.टी. चौकशीसाठी बाहेर जिल्ह्यातील अधिकारी नेमण्यात यावे, निर्भीड व विशेष सरकारी वकीलाची नेमणुक करण्यात यावी, न्यायलयीन खटला बीड जिल्ह्याबाहेर व फासट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा आदी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. या मोर्चात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, खासदार संजय देशमुख आणि इतर राजकीय नेते तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.