कोटी रुपयाची वाटमारी करणारे २४ तासात जेरबंद !

१ कोटी २ लाख हस्तगत : दोन आरोपी अटक

    दिनांक :11-Jan-2025
Total Views |
वाशीम,
HDFC Bank- Washim : हिंगोली मार्गावर असलेल्या बाहेती मार्केटमध्ये काम करणारे विश्वासातील विठ्ठल हजारे यांना एचडीएफसी बँक वाशीम येथील चेक देवुन १ कोटी बँक मधुन व १५ लाख रुपये मित्राकडुन आणण्यास सांगीतले. त्याप्रमाणे विठ्ठल हजारे आणि ज्ञानेश्वर बैस हे १ कोटी १५ लाख रुपये घेवुन स्कुटीने बाहेती मार्केट हिंगोली रोड येथे घेवुन जात असता उड्डान पुलावर मागुन अज्ञात दोन इसम मोटार सायकलवर येवुन विठ्ठल हजारे व ज्ञानेश्वर बायस यांना रॉड व हत्याराने मारहान करुन विठ्ठल हजारेकडील १ कोटी १५ लाख रुपये असलेली बॅग हिसकावुन मोटार सायकलने पळुन गेले. या घटनेचा पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करून अवघ्या २४ तासात आरोपींना जेरबंद करून यशस्वी कामगिरी केली आहे.
 
Washim
 
या घटनेची माहिती पोलिस अधीक्षक अनुज तारे यांना मिळताच अपर पोलीस अधीक्षक फड, उप विभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल, पोनि, स्थानिक गुन्हे शाखा असे सर्व अधिकारी सर्व स्टाफसह तात्काळ घटनास्थळ गाठुन व देवळे हॉस्पीटल वाशीम येथे उपचार घेत असलेले विठ्ठल हजारे व ज्ञानेश्वर बायस यांचेकडुन गुन्हयाची माहिती घेतली. दि. ९ रोजीच रोजी ६ वाजता दरम्याण विनाविलंब तपासाकरीता वेगवेगळया टिम तयार करुन सर्व प्रथम वाशीम शहरातील घटनेच्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज मिळवुन आरोपींची माहिती घेतली. HDFC Bank- Washim  विशेष पोलीस महानिरीक्षक, रामनाथ पोकळे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तात्काळ जिल्हा अकोला, यवतमाळ, अमरावती ग्रामीण येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वाशीम येथे बोलावुन घेतले. वाशीम जिल्हा पोलिस आणि अकोला, यवतमाळ, अमरावती ग्रामीण येथील स्थानिक गुन्हे शाखा असे अनेक पथक तयार करून गुन्हयाचा तपास सुरू करण्यात आला. मिळालेल्या माहिती व सीसीटीव्ही फुटेज वरुन रात्रभर सर्व अधिकारी व अंमलदार यांनी अथक परीश्रम घेतले.
 
त्यानंतर गुन्हयातील आरोपींचे शोध कामी घटनाक्रम लावुन तांत्रीक तपासावर भर देवुन तपासातील टिम वेगवेगळया ठिकाणी रवाना करुन जिल्हयाचे आजुबाजुचे सर्व लहान-मोठी शहरातील हॉटेल, लॉजेस, बार व संशयीत ठिकाणे चेक करण्यात आली. जेथे मिळतील त्या त्या सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज घेण्याचे काम सतत चालुच होते. २.४० वाजताचे दरम्यान सीसीटीव्ही फुटेज घेत असता घटना घडल्यापासुन ते आतापर्यंतच्या तपासातील मिळालेल्या माहिती वरुन सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारे दोन ईसम हेच गुन्हयातील आरोपी असल्याची खात्री झाली. HDFC Bank- Washim  त्यातील एक व्यक्ती हा विजय गोटे असून तोंडगाव येथील असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने तपासाची चक्रे फिरवुन त्यास विनाविलंब ताब्यात घेतले. त्यानंतर सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली व ईतर आरोपींची नावे दिल्याने गुन्हा उघडकीस आणला. गुन्हयातील दुसरा आरोपी संजय गोटे (रा तोंडगांव ) यास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचे ताब्यातुन गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल १ कोटी २ लाख रुपये जप्त करण्यात आले.
 
सदर गुन्हयाचा तपास विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, अमरावती परिक्षेत्र अमरावती, अनुज तारे, पोलीस अधिक्षक वाशिम, श्रीमती लता फड, अपर पोलीस अधिश्वक, वाशिम, सहायक पोलीस अधिक्षक नवदीप अग्रवाल यांचे मार्गदर्शनात पोनि स्थागुशा रामकृष्ण महल्ले, पोनि प्रदिप परदेसी, पोनि देवेंद्रसिंह ठाकुर, व इतर सपोनि पोउपनि व अंमलदार यांनी केला. पोलीसांनी रात्रंदिवस न थांबता अथक परिश्रम घेतले. HDFC Bank- Washim  तांत्रीक तपासामुळेच गुन्हा उघडकीस आला आहे. याबाबत वरीष्ठ पातळीवर सुध्दा दखल घेण्यात आली आहे.
तपास पथकाला ७० हजाराचा रिवार्ड !
शहरात काल घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरातील पोलिस दलात खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास करणे अतिशय महत्त्वाचे होते. म्हणूनच या गंभीर घटनेची अमरावतीचे पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी दखल घेऊन तपासाची पूर्ण यंत्रणा काटेकोरपणे कामाला लावली. HDFC Bank- Washim अमरावती परिक्षेत्रातील सर्व पथकांनी मिळून उल्लेखनीय कामगिरी केली त्याबद्दल पोलीस महासंचालक रामनाथ पोकळे यांनी ७० हजाराचा रिवार्ड घोषित केला आहे.