बुलढाणा,
Herds of locusts destroy crops : तालुक्यातील हतेडी व पांग्री परिसरात वन्य प्राण्यांने शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे. शेतपिकांवर झडप घालून वन्यप्राणी पिकांची नासाडी करीत असल्याने वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त करण्यात यावा अशा तक्रारी या परिसरातील शेतकर्यांनी वन विभागाकडे केल्या आहे.
हतेडी व पांग्री परीसरात रोही या वन्य प्राण्यांचे मोठमोठे कळप असून एका कळपात 9 ते 10 रोही असून ते एका शेतात घुसल्यानंतर संपूर्ण पिकांची नासाडी करतात यामुळे शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. याबद्दल वारंवार वन विभागाकडे तोंडी फोन द्वारे शेतकर्यांनी तक्रारी केल्या तरी काही फरक पडत नाही. हातातोंडाशी आलेला घास जर वन्य प्राणी हिसकून घेत असेल तर मग शेतकर्यांनी जगावे कसे असा प्रश्न निर्माण होत आहे.
हजारो रुपये खर्च करून महागडे बियाणे, खते खरेदी केले व काही शेतकर्यांनी कर्ज काढून शेतीसाठी बियाणे, खते, औषधी खरेदी केली व शेतकर्यांनी पेरणी केली. आता हरभरा, करडई, गहू या पिकांचे अंकुर जमिनीतून बाहेर निघाले असून, अंकुर पिकांची वाढ होत असताना व काही पिके काढायला सुरुवात झाली आहे, वन्य प्राणी शेतकर्यांच्या पिकांची नासाडी करीत आहेत हे नुकसान टाळण्यासाठी या वन्यजीव रोही प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या परीसरातील शेतकर्यांनी केली आहे. बंदोबस्त होत नसेल तर शेतकर्यांना नुकसान भरपाई किंवा शेतकुंपन लावून देण्याची व्यवस्था करावी अशीही मागणी होत आहे.
शेतकरी राजेश ठोंबरेची प्रतिक्रीया
आम्ही कर्ज काढून बियाणे, खते खरेदी केली. शेती पिकासाठी पेरणी केली आहे. आलेल्या पिकांवर कधी निसर्ग कोप पावतो तर वन्य प्राणी शेतमालाव झडप घालतात. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शासन यासाठी काही व्यवस्था करीत नाही. या वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त होत नसेल तर इतर सुविधा देऊन शेतकर्यांना मदत करावी अशी मागणी हतेडी पांग्री परीसरातील शेतकरी राजेश ठोंबरे यांनी केली आहे.