भरधाव तवेराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

12 Jan 2025 19:45:15
तभा वृत्तसेवा
पुलगाव, 
Pulgaon accident : भरधाव तवेरा कारने समोरून येणार्‍या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आगरगाव शिवारातील पिपरी (खराबे) रोडवर आज रविवार दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. तवेरा कारमधील गंभीर जखमींना उपचाराकरिता सावंगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दीपक राऊत (43) रा. वाटखेडा ता. देवळी जि. वर्धा असे मृतकाचे नाव आहे.
 
 
 
pulgao
 
 
दीपक राऊत हे एम. एच. 32 ए.सी. 8043 क्रमांकाच्या दुचाकीने पुलगाव येथे वैयक्तिक कामानिमित्त जात होते. दरम्यान, नाचणगाव येथून भरधाव वेगाने येत असलेल्या एम. एच. 13 ए. सी. 2344 क्रमांकाच्या तवेरा चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यात दीपक यांचा जागीच मृत्यू झाला. तर तवेरा वाहनाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. यात कारमधील पाच ते सात लोकं गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुलगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास पुलगाव पोलिस करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0