राजस्थानी मल्टीस्टेट ढाणकी शाखेकडून ४३ ठेवीदारांना २.५१ कोटींनी गंडवले

13 Jan 2025 19:41:50
- संचालकांसह शाखा व्यवस्थापकावर गुन्हे दाखल

ढाणकी, 
Rajasthani multistate Dhanki branch : परळी वैजनाथ मुख्यालय असलेल्या राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ व ढाणकी शाखा व्यवस्थापकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यासाठी बाबूसिंग राठोड व ४३ गुंतवणूकदारांनी सामूहिक तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून शाखा व्यवस्थापक अभिजित पुरमे, अध्यक्ष चंदुलाल बियाणी व इतर १२ संचालकांंवर गुन्हे दाखल करण्यात आले.
 
 
bank logo d
 
येथील जुन्या बसस्थानक चौकात ३ ऑगस्ट २०२३ ला मोठा गाजावाजा करून थाटामाटात या शाखेचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यावेळी परिसरात घरोघरी व बाजारपेठेत इतर बँका व पतसंस्थांपेक्षा अधिक परतावा व आधुनिक सुविधा देऊ, असे प्रलोभन दाखविल्यामुळे पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात गोरगरीब व पैसेवाल्यांनी पैसे गुंतविले.
 
 
Rajasthani multistate Dhanki branch : ढाणकी शाखेत जवळपास ६ कोटींची गुंतवणूक झाली असल्याचे ठेवीदारांकडून सांगितले जात आहे. परंतु नोव्हेंबर महिन्यापासून शाखेचा व्यवहार पूर्णपणे डबघाईस आल्यामुळे ठेवीदारांना आपले पैसे मिळविण्यासाठी तारीख पे तारीख आणि उत्तरे मिळत गेली. त्यामुळे शेवटी ठेवीदारांनी ७ एप्रिल २०२४ ला सहकारमंत्री, सहकार आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा निबंधक, तहसीलदार तसेच शाखा व्यवस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना आपली रक्कम मिळण्यासाठी निवेदन दिले. परंतु निवेदनाची कोणतीही दखल आजपर्यंत न घेता ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळालेली नाही.
 
 
Rajasthani multistate Dhanki branch : शेवटी ढाणकी पोलिस चौकीत २६ जून २०२४ रोजी सर्व संबंधितांवर गुन्हे नोंदण्यासाठी एकूण ४४ ठेवीदारांनी सहायक उपनिरीक्षक शिवाजी टिपुर्णे यांना आमची २ कोटी ५१ लाखांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने शाखा व्यवस्थापक अभिजित पुरमे, अध्यक्ष चंदुलाल बियाणी व इतर १२ सदस्यांवर ४२०, ४०६, ४०५, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राजस्थानी मल्टिस्टेट शाखा ढाणकीत ५-६ महिने गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने उघडी ठेवली होती. कर्जवाटप एक रुपयाचेही केले नसून ही शाखा बंद केल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे.
Powered By Sangraha 9.0