नागपूर,
All India Marathi Literature Conference दिल्ली येथे फेब्रुवारी महिन्यात होणार्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलमासाठी जाऊ इच्छिणार्या प्रतिनिधींना रेल्व प्रवासात किमान एकतर्फी नि:शुल्क प्रवासाची तरी सवलत द्यावी अशी मागणी मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे.

राज्याच्या निर्मितीनंतर All India Marathi Literature Conference प्रथमच व एकूण ७० राजधानीत, दिल्लीत होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी प्रतिनिधी म्हणून जाऊ इच्छिणार्यांना खर्चाचा मोठा भुर्दंड सहन करावा लागणार लागणार आहे. निवासाची व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनात नि:शुल्क उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याच प्रमाणे, संमेलन प्रतिनिधींसाठी स्लीपर श्रेणीतील, एकतर्फी तरी रेल्वे प्रवासाची सोय करून देण्याची केंद्राला करावी किंवा ती जबाबदारी महाराष्ट्र सरकारने स्वतः घ्यावी. अशी मागणी पत्राद्वारे मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे प्रमुख संयोजक डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठी भाषा मंत्र्यांना केली आहे. फार पूर्वी रेल्वेची ही सवलत संमेलन प्रतिनिधींसाठी उपलब्ध होती, तसेच पंजाबातील घुमान येथील संमेलनावेळी सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना सोय त्यांनी करून दिली होती याचे स्मरणही या पत्रात करून दिले आहे.