- अत्याधुनिक तिथी नक्षत्र यंत्राची स्थापना
नागपूर,
Aryabhatta Astronomy Park : तिथी व नक्षत्र यंत्राचे संशोधन व स्वयंसंचालन आर्यभट्ट अॅस्ट्रॉनॉमी पार्क, चौकी, कान्होलीबारा, हिंगणा येथे व्हीएनआयटी नागपूरच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रा. प्रेमलाल पटेल यांनी पत्रपरिषदेत सांगितले. व्हीएनआयटीच्या तज्ञ व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात संशोधन करून हे यंत्र अभ्यासकांना उपलब्ध करुन दिले आहे. या संशोधनाकरिता एक वर्ष लागले असून श्रीक्षेत्र चौकी, कान्होलीबारा हिंगणा येथील आर्यभट्ट अॅस्ट्रॉनॉमी पार्कमध्ये बघायला मिळणार असल्याची माहिती डॉ. पटेल यांनी दिली.
कान्होलीबारा येथे नक्षत्र यंत्राचे ग्रहांच्या भ्रमणांनुसार कम्प्युटर व सॅटेलाईटद्वारे व्हीएनआयटी नागपूरच्या माध्यमातून संशोधित करण्यात आले गत वर्षी मार्च महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी श्रीक्षेत्र चौकी येथे भेट दिली होती. दरम्यान या कार्याची संपूर्ण माहिती डॉ. प्रमोद पडोळे यांनी दिली होती. श्रीक्षेत्र चौकी येथे वार यंत्र, श्रीयंत्र, गुरु बृहस्पती मंदिर, शनि मंदिर व सूर्य घडी हे पर्यटकांचे विशेष आकर्षण केंद्र आहे. शालेय तथा महाविद्यालयीन तसेच शिक्षकांना हे आर्यभट्ट अॅस्ट्रॉनॉमी पार्क वैदिक विज्ञान व आधुनिक माहिती देणारे विदर्भातील एकमेव पर्यटनस्थळ आहे. आतापर्यंत या विषयावर कुठेही संशोधन झाले नाही. हे संशोधन विदर्भवासियांसाठी कौतुकाची गोष्ट आहे. याचे लवकरच पेटेंट होणार असून या संशोधनाचे अहवाल जगभरात लवकरच प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. प्रा. प्रेमलाल पटेल, डॉ. दिलीप पेशवे आचार्य भूपेश गाडगे यांनी दिली.
Aryabhatta Astronomy Park : व्हीएनआयटीचे प्रा. डॉ. दिलीप पेशवे, प्रा.डॉ. शितल राऊत, प्रा.डॉ. जयश्री सातपुतळे, प्रा.डॉ. अश्विन ढबाले, आर्या देवर्ला, ऋषिकेश पोतदार, तसेच यंत्राची संकल्पना आचार्य भूपेश गाडगे यांची असून आचार्य पूजा गाडगे, आचार्य किशोर पवनीकर, दायरे, रमेश मिश्रा, रामदास फुलझेले, श्रेयस गाडगे आदींचे या संपूर्ण संशोधित करण्याच्या कार्यास सहकार्य लाभले आहे.