पुसद,
विदर्भाच्या वाङमयीन सांस्कृतिक व कलाक्षेत्राच्या केंद्रस्थानी असलेल्या Vidarbha Sahitya Sangh विदर्भ साहित्य संघाचा राजन लाखे पुरस्कृत सर्वोत्कृष्ट शाखा संक्रांतीच्या पर्वावर १०२ व्या वर्धापन दिनानिमित्त पुसद शाखेला मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
Vidarbha Sahitya Sangh : या पुरस्काराचे स्वरूप रोख ५ हजार रुपये व सन्मानचिन्ह असून हा पुरस्कार पुसद शाखेचे सचिव डॉ. उत्तम रुद्रवार, सदस्य प्रा. गोविंद फुके व सुधाकर ठाकरे यांनी स्वीकारला. विदर्भातील एकूण ६८ शाखांमधून ही निवड करण्यात आली. या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते होते. रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर, डॉ. अभय बंग, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास शिरपूरकर तसेच विदर्भ साहित्य संघाचे विश्वस्त उपस्थित होते.