सरोजिनी पब्लिक स्कूलचे घवघवीत यश

    दिनांक :18-Jan-2025
Total Views |
नागपूर,
Sarojini Public School Wadi FIT इंडिया अंतर्गत मॉन्टेक्स बॉल क्रिकेट असोसिएशन गोंदिया द्वारा दिनांक १० जानेवारी ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत गोंदिया येथे राज्यस्तरीय मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली . सदर स्पर्धेत विविध जिल्ह्यातील अनेक शाळा आपल्या खेळाडू मुला मुलींनी च्या टीम सह मोठ्या संख्येने सहभागी झाल्या . या स्पर्धेत सरोजिनी पब्लिक स्कूल महादेव नगर ,वाडी नागपूर येथील विद्यार्थी अनुराग कोकाटे व त्याच्या टीमला घवघवित यश मिळाले व त्या अनुषंगाने त्यांची राष्ट्रीय मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेली आहे
 

muli 
 
 अनुराग कोकाटे व त्याच्या टीमला मिळालेल्या यशाबद्दल सरोजनी पब्लिक स्कूलचे संचालक व अध्यक्ष पी. शशिधर व मुख्याध्यापिक सुषमा निशाने यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी सहभागी विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.Sarojini Public School Wadi विद्यार्थ्यांनी मिळविलेला हा विजय आमच्या शाळेसाठी अभिमानास्पद आहे अशा भावना शाळेच्या संचालक व शिक्षकांनी व्यक्त केल्या .
सौजन्य:संदीप  कोहळे ,संपर्क मित्र