अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन विद्यार्थी ठार

    दिनांक :18-Jan-2025
Total Views |
- अपघातानंतर अज्ञात व्यक्तीने मृतदेह नालीत फेकले

महागाव, 
Student accident : मित्राच्या वाढदिवसाचे जेवण करून घरी परतणार्‍या दोन विद्यार्थ्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात व्यक्तीने मृतदेह व दुचाकी महामार्गालगत असलेल्या नालीमध्ये टाकल्याने अपघात नसून घातपात संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.
 
 

Mahagav acci
 
महागाव तालुक्यातील वाकोडी येथील अर्जुन गजेंद्र देशमुख (वय १९) व अजय सतीश वीरखेडे (वय २२) हे शुक‘वार, १७ जानेवारीला आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीसाठी नांदगव्हाणच्या जगीरा धाब्यावर गेले होते. जेवण करून परत येत असताना नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर महागाव ते मुडाणा दरम्यान लुटे यांच्या मध्यरात्री त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने अपघातकर्त्या वाहनातील इसमाने दोन्ही युवकांचे मृतदेह व दुचाकी काही अंतरावर नालीमध्ये टाकून पोबारा केला.
 
 
Student accident : ही घटना शनिवार, १८ जानेवारीला सकाळी शेतात गेलेल्या शेतकर्‍यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी याची माहिती महागाव पोलिस व नातेवाईकांना दिली. त्यानंतर नातेवाईक व महागाव पोलिस धनराज निळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह सवना ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. मृतदेह अपघातस्थळावरून महामार्गालगत असलेल्या शेतातील नाल्यात टाकण्यात आल्याने शंकेला जागा निर्माण झाली असून हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.