तभा वृत्तसेवा
वर्धा,
accident on Samruddhi Highway, : एक महिन्यापूर्वी लग्न झालेल्या स्थानिक भगतसिंग चौक, रामनगर येथील अभिलाष चंद्रभान ढोणे (खापरी ढोणे) यांचा मध्यरात्री 1.30 वाजता नागपूरवरुन वर्धेकडे येताना जामठा-नागपूर येथून समृद्धी महामार्गावर जात असताना कंटेनरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला तर पत्नी थोडक्यात बचावली.
अभिलाष ढोणे पुणे येथील आयटी कंपनीमध्ये नोकरीला होता. 7 डिसेंबर 2024 रोजी तो विवाहबद्ध झाला. अभिलाषची घरची अजून विद्युत रोषणाई सुद्धा काढली नव्हती तर भविष्याचे स्वप्न बघणारी पत्नी रुचिकाच्या हाताची हळद, मेहंदीही तशीच होती. आयर्लंड येथे वास्तुविशारद असलेली बहीण भावाच्या लग्नाला धमाल करत 15 दिवस मुक्कामी होती. मात्र, काळाने असा डाव साधला की चंद्रभान पाटील ढोणे परिवार शोक सागरात बुडाला.
अभिलाष ढोणे हा पत्नी रुचिकासोबत नागपूरवरून वर्धेला येत होता. दरम्यान, रात्री 1.30 वाजता कंटेनरने त्यांच्या वाहनाला जबर धडक दिली. अपघात इतका भीषण होता की चालकाकडील बाजू अक्षरशः कंटेनरने कापत नेली. यात अभिलाषचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी रुचिका किरकोळ जखमी झाली.