व्हीएनआयटी माजी विद्यार्थ्यांचे गोल्डन जुबली रीयुनियन

    दिनांक :22-Jan-2025
Total Views |
- पन्नास वर्षांनंतर माजी विद्यार्थी आले एकत्रित
 
नागपूर, 
Golden Jubilee Reunion : विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या १९७५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी ५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून एकत्रित येत गोल्डन रीयुनियनचा आनंद घेतला. देशविदेशातील माजी विद्यार्थी एकत्रित येत महाविद्यालयातील आठवणींना उजाळा देण्यासाठी तीन दिवसीय कार्यक्रम घेण्यात आला. व्हीएनआयटीच्या परिसरात सहकुटुंब एकत्र येण्याचा आनंद अविस्मरणीय होता.
 
 
V-N-I-T-Goldan
 
Golden Jubilee Reunion : संस्थेचे संचालक डॉ. पटेल यांनी प्रत्येक माजी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन औपचारिक स्वागत केले. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांतर्फे सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. प्रशासकीय अधिकारी मदभूषी गोपाल यांनीही संवाद साधला.राधाकृष्ण लॉन्स, बुटीबोरी येथे मित्र मेळावा घेण्यात आला. वाकेश्वर येथील तलावाच्या रम्य परिसरात विवेक देशपांडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.याशिवाय कोराडी मंदिरात एकत्रित दर्शन घेण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. विकास सोहोनी यांच्यासह व्हीएनआयटीचे सुरेश जुनघरे, दिलीप कामदार व इतर सर्व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.