कृष्णा मोहोड, रजत महाजन ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’

22 Jan 2025 21:31:24
- खासदार महोत्सव: रायफल शूटींग स्पर्धा
 
नागपूर, 
Rifle Shooting Competition : खासदार क्रीडा महोत्सवातील रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये कृष्णा मोहोड व रजत महाजन ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ ठरले. छत्रपतीनगरातील संभाजी पार्कमध्ये ही स्पर्धा पार रायफल प्रकारामध्ये कृष्णा मोहोड व क्रिष्णा शेळके यांच्यात अंतिम सामना झाला. कृष्णा ‘चॅम्पियन’ ठरला तर क्रिष्णा शेळके ला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पिस्टल प्रकारात रजत महाजनने मोहम्मद अतहर ला मात देत ‘चॅम्पियन’चा खिताब पटकाविला.
 
 
nembaji
 
Rifle Shooting Competition : एअर रायफल प्रकारात महिलांमध्ये समिक्षा नरसिंगवार विजेती ठरली. कनक जैस्वालला उपविजेतपदावर व धरणी दोरहाडाला तिसर्‍या समाधान मानावे लागले. एअर पिस्टलमध्ये पुरुष गटात मोह.अतहर ने पहिले, अदनान अली ने दुसरे आणि शशांक केडवतकर ने तिसरे स्थान प्राप्त केले. महिलांमध्ये प्रमेशा झाडे पहिली ठरली. अनिशा राउत व पुष्पलता मनुष्मा यांनी दुसरे आणि तिसरे स्थान पटकाविले.
 
निकाल: एअर रायफल:
१४ वर्षाखालील मुले : सात्विक माणुसमारे, शौर्य राघव नागुलवार
१४ वर्षाखालील मुली : रिधीमा शनाया बागडे, कृतीका खारपसे
१८ वर्षाखालील मुले : हिमांशू गभणे, प्रथमेश मेंडेवार, सिद्धेश द्रवेकर
१८ वर्षाखालील मुली : धरणी दोरहाडा, अर्णवी खोब्रागडे, सनाया बाघडे
२१ वर्षाखालील मुले : कृष्णा मोहोड, हिमांशू गभणे, प्रथमेश मेंडेवार
२१ वर्षाखालील मुली : धरणी दोरहाडा, धनश्री कांबडे, खोब्रागडे
पुरुष : कृष्णा मोहोड, क्रिष्णा शेळके, प्रथमेश नामपल्लीवार
महिला : समिक्षा नरसिंगवार, कनक जैस्वाल, धरणी दोरहाडा
 
एअर पिस्टल:
१४ वर्षाखालील मुली : हरलीन कौर
१८ वर्षाखालील मुले : अदनान अली, क्रिष्णा सोनी, वीर चौधरी
१८ वर्षाखालील मुली : प्रमेशा झाडे
२१ वर्षाखालील मुले : अदनान अली, वीर चौधरी, पांडे
२१ वर्षाखालील मुली : प्रमेशा विधी चौहान
पुरुष : मोहम्मद अतहर, अदनान अली, शशांक केडवतकर
महिला : प्रमेशा झाडे, अनीशा राउत, पुष्पलता मनुष्मा
Powered By Sangraha 9.0