अपघातात एकाचा मृत्यू

23 Jan 2025 21:44:01
नागपूर, 
Nagpur accident : भरधाव जाणाèया कार चालकाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेले परमेश्वर ठाकरे (55) रा. गुमथळा यांचा मृत्यू झाला तर दिलीप भोयर (55) आणि नरेंद्र तिडके (55) दोन्ही रा. गुमथळा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना कोराडी ठाण्याअंतर्गत घडली.
 
 
jkljlj
 
बुधवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास परमेश्वर, दिलीप आणि नरेंद्र हे ट्रिपल सीट चक्कीखापा मार्गाकडे जात होते. बोखारा परिसरात नवीन आरटीओ चौकीजवळ कारच्या चालकाने निष्काळजीपणे भरधाव वाहन चालवून त्यांच्या मोटारसायकलला जबर धडक दिली आणि फरार झाला. तीनही मित्र खाली पडून गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. कोराडी पोलिस घटनास्थळी पोहोचले. तिघांनाही उपचारार्थ मेयो रुग्णालयात केले. उपचारादरम्यान परमेश्वर यांचा मृत्यू झाला. दिलीप आणि नरेंद्र यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी परमेश्वर यांचा पुतण्या निश्चल ठाकरे यांच्या तक्रारीवरून आरोपी कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
Powered By Sangraha 9.0