अवैध रेती वाहतूक करणार्‍या वाहनावर कारवाई

-१.२२ लाखांचा दंड वसूल

    दिनांक :24-Jan-2025
Total Views |
कारंजा लाड,
Illegal sand transportation : अवैध रेती वाहतूक करणार्‍या एका वाहनावर महसूल विभागाने २२ जानेवारी रोजी दुपारी ४.३० वाजता नागपूर संभाजीनगर द्रुतगती मार्गावरील सावरकर चौकाजवळ कारवाई करून वाहन जप्त केले. एम.एच. ०४ सि.पी. ५५१८ क्रमांकाचे टिप्पर मधून अवैध रेती वाहतूक होत असल्याचे तलाठ्यांना आढळले.
 
Illegal sand transportation
 
त्यामुळे त्यांनी वाहन थांबवून चौकशी केली असता त्यात अर्धा ब्रास रेतीची विनापरवाना वाहतूक होत असल्याचे आढळून आल्याने वाहन जप्त करून तहसील कार्यालय परिसरात लावण्यात आले. सदर प्रकरणी प्राप्त अहवालावरून वाहन मालकास १ लाख २२ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. Illegal sand transportation ही कारवाई तहसीलदार कुणाल झळते यांच्या मार्गदर्शनात निवासी नायब तहसीलदार अनिल वाडेकर व तलाठी राहुल वरघट आणि प्रवीण उमक यांनी केली. मागील काही दिवसापासून अवैद्य गौण खनिज व अवैध रेती वाहतूक करणारे महसूल विभागाच्या रडारवर असल्याने सातत्याने कारवाई केल्या जात आहे. त्यामुळे अवैद्य गौण खनिज व रेती वाहतुकीस काही प्रमाणात आळा बसल्याचे दिसून येत आहे.